Manipur Violence: मणिपूरमध्ये जमाव हिंसक, केंद्रीय मंत्र्यांच्या घराला लावली आग
Manipur Violence: मणिपूरमधील केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंह (RK Ranajn Singh) यांच्या निवासस्थानावर गुरुवारी (15 जून) रात्री उशिरा जमावाने हल्ला केला. जमावाने इंफाळमधील कोंगबा येथील मंत्र्यांच्या निवासस्थानाची तोडफोड केली आणि जाळपोळ केली.
जमावाने हल्ला केला त्यावेळी मंत्री राजकुमार रंजन सिंह हे निवासस्थानी उपस्थित नव्हते. या घटनेवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की सध्याचे राज्य सरकार शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरले आहे.
Kangana Ranaut: पंगा क्विन कंगना लग्नाच्या बेडीत अडकणार? म्हणाली, ‘लग्न करण्याची इच्छा आहे, पण…’
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मंत्री आरके रंजन सिंह म्हणाले, “मी कोचीमध्ये आहे, माझ्या राज्यात (मणिपूर) नाही. मी माझे घर खूप कष्टाने बांधले होते. माझ्या घरावर हल्ला झाला याचे मला दुःख आहे आणि माझ्या राज्यातील नागरिकांकडून अशा वृत्तीची अपेक्षा नव्हती.
मणिपूरमध्ये कर्फ्यू असूनही या आठवड्यात हल्ले आणि चकमकीच्या घटना समोर आल्या आहेत. याआधी गुरुवारी, दुपारी मणिपूर रॅपिड अॅक्शन फोर्स आणि जमावामध्ये इम्फाळमध्ये चकमक झाली होती. जमावाने दोन घरे पेटवून दिली होती.
WTC फायनलमध्ये खेळवलं नाही तरी, कर्णधार रोहितच्या बचावासाठी अश्विन मैदानात
सुमारे एक महिन्यापूर्वी, राज्यातील मेईतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक हिंसाचारात 100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. राज्यातील मेईतेई समुदाय बर्याच काळापासून अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाची मागणी करत आहे, ज्याच्या निषेधार्थ 3 मे रोजी डोंगराळ जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मार्च’ आयोजित करण्यात आला होता.
#WATCH मणिपुर: भीड़ ने गुरुवार देर रात को विदेश राज्य मंत्री आर.के. रंजन सिंह के इंफाल के कोंगबा में स्थित उनके आवास पर हमला किया। pic.twitter.com/8LPmRzwaUr
— ANI_HindiNews (@AHindinews) June 16, 2023
‘आदिवासी एकता मार्च’नंतर हिंसाचार झाला होता. तेव्हापासून राज्यातील हिंसाचार थांबत नाही. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक पावले उचलत आहेत. अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्याचा दौरा केला होता.