मुंबई : भाजपचे ( BJP ) नेते आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray ) घणाघाती टीका केली आहे. ज्यांना त्यांच्या कुटूंबातील सदस्यांची साथ नाही भेटली ते जनतेच्या साथीची काय अपेक्षा करणार, अशा शब्दात शेलारांनी ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची काल खेड येथे सभा झाली होती. यावेळी त्यांनी भाजप व शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यांना अभ्यास करण्याची गरज आहे. त्यांना विस्मरण झाल्याची देखील शक्यता आहे. त्यांच्या पक्षाचा जेव्हा जन्म देखील झालेला नव्हता तेव्हा मुंबईमध्ये आमच्या पक्षाचे नगरसेवक होते. तसेच त्यांच्या पक्षाचे जेव्हा आमदार देखील नव्हते, तेव्हा आमच्या पक्षाचे मुंबई व महाराष्ट्रात आमदार होते. उद्धव ठाकरेंनी आमचे बोट पकडून एक-एक जागा घेतल्या. आम्ही आत्तापर्यंत खुप सहन केलेे आहे. आता त्यांन जोरदार उत्तर मिळत आहे, अशा शब्दात शेलारांनी ठाकरेंवर टीका केली आहे.
भास्कर जाधवांना राजकारणातून संपवणार, कदम-जाधवांचं रंगलं वाकयुद्ध
ज्यांना आपल्या पक्षाच्या आमदारांची साथ नाही मिळाली. ज्यांना आपल्या पक्षाच्या नेत्यांची साथ नाही मिळाली. ज्यांना आपल्या सख्ख्या भावा-बहिणींची साथ नाही मिळाली. ज्यांना आपली वहिनी व चुलत भावाची देखील साथ नाही मिळाली, ते जनतेकडून साथ मिळेल याची काय अपेक्षा करणार, असे म्हणत शेलारांनी ठाकरेंवर तोफ डागली आहे.
मुंबईमध्ये काल भाजप व शिंदेंची शिवसेना या दोन्ही पक्षाची संयुक्त आशीर्वाद यात्रा निघाली होती. यावेळी आशिष शेलरांनी आपल्या हातात धनुष्यबाण घेतला होता. यावरुन त्यांच्यावर ठाकरे गटाने टीका केली होती. त्याला देखील शेलारांनी उत्तर दिले आहे. धनुष्यबाण हा प्रभू श्रीरामाचा आहे. त्याच्यावर कुणाही एका पक्षाचे नाव नाही, असे ते म्हणाले आहेत.
शरद पवारांकडून चंद्रकांत पाटलांचा पाणउतारा; म्हणाले, ‘शहाण्या माणसाबद्दल विचारा…’
दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील उद्धव ठाकरेंवर आरोप केले आहेत. किरीट सोमय्यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला होता. त्याचवेळी सोमय्यांनी रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्यावर 19 बंगल्याचा आरोप केला होता. या सर्व गोष्टीसमोर आल्यानंतर तत्कालीन ठाकरे सरकारनं तेथील रेकॉर्ड, पुरावे कशा पद्धतीनं नष्ट केल्याचे पुरावे रेवदंडा पोलीस ठाण्यात दिल्याचं सांगून उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर यांना हिशेब द्यावाच लागणार असंही आपल्या ट्वीटद्वारे म्हटले आहे.