भास्कर जाधवांना राजकारणातून संपवणार, कदम-जाधवांचं रंगलं वाकयुद्ध
मुंबई : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये कोकणातील सभेनंतर चांगलच वाकयुद्ध रंगलंय. नया मुल्ला जोर से बांग देता है, तसा हा भाडगा मुल्ला असल्याचा टोला शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी लगावला आहे. भास्कर जाधव हा चिपळूणचा लांडगा आहे. भास्कर जाधवांनी मी राजकारणातून संपवणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
Shivendraraje Bhosale : औरंगजेबाचे फोटो लावणाऱ्यांवर देशद्रोह दाखल करा, शिवेंद्रराजेंची मागणी
बाळासाहेब नेहमीच सांगायचे भाडगा अधिक कडवा असतो, तसा हा भाडगा असा भास्कर जाधवांचा एकेरी उल्लेख त्यांनी केला आहे. तसेच हा आधी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीत गेला. त्यानंतर पुन्हा पवारांच्या पाठीत खंजीर खूपसून शिवसेनेत आला, अन् तो आता रामदास कदमवर बोलत आहे. त्याची अवकात तरी आहे का? असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
शरद पवारांकडून चंद्रकांत पाटलांचा पाणउतारा; म्हणाले, ‘शहाण्या माणसाबद्दल विचारा…’
भास्कर जाधव हा एहसान फरमोश माणूस आहे. जाधवच्या निवडणुकीसाठी मी टेम्पोच्या टेम्पो माणसं चिपळूणला पाठवले होते. त्यावेळी लोकांना कपडे, साड्या, भगवे झेंडेही पाठवले होते.
1995 साली भास्कर जाधवला बाळासाहेबांनी मी तिकीट देण्यासाठी सांगितले होते. तेव्हा मी बाळासाहेबांना विनंती केली होती. तिकीट मिळाल्यानंतर माझ्या लोटांगण घालून पाया पडला होता, अन् आता उद्धवजींना दाखविण्यासाठी तु निष्ठावान झाला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केलीय.
ठाकरे, वायकरांना हिशेब द्यावाच लागणार; सोमय्यांनी थेट पुरावेच मांडले, बडे अधिकारीही गोत्यात
जनतेच्या विकासासाठी खोक्यांनी पैसा शिंदे सरकार देत आहे, उद्धवजी तुम्ही कधी दिलेत का शिवसेनेच्या आमदारांना पैसे? असा खोचक सवाल कदम यांनी केला आहे.
तुम्ही मातोश्री आणि अजित दादा मंत्रालयात बसत होते. उध्दवजी ज्या दिवशी तुम्ही सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या मांडीवर बसलात त्या दिवशी तुमचं हिंदुत्व सगळं संपलं, असल्याचंही ते म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह ट्वीट; गुन्हा दाखल
दरम्यान, रत्नागिरीतील खेडमध्ये उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. या सभेत ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंसह इतर आमदारांवर निशाणा साधला. त्यानंतर आता शिंदे गटाच्या नेत्यांकडूनही चांगलाच समाचार घेतला जातोय.