Download App

अशिष शेलारांचा चंद्रकांतदादांना सल्ला, ‘नको ते बोलू नका’

Maharashtra Politics: भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बाबरी मशीद विध्वंसात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेबद्दल भाष्य केले नसते तर बरे झाले असते, असा सल्ला मुंबई भाजपचे प्रमुख आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिला आहे. पाटील यांनी म्हटले होते की, 1992 मध्ये अयोध्येतील बाबरी मशीद (Babri Masjid) पाडली त्यावेळी शिवसेनेचा एकही कार्यकर्ता उपस्थित नव्हता.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत राज्यात दोन्ही पक्ष सरकारमध्ये भागीदार आहे. चंद्रकांतदादांच्या या विधानामुळे भारतीय जनता पक्ष संकटात सापडला आहे. नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर शेलार यांची प्रतिक्रिया आली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी खासगीत ही प्रतिक्रिया दिली होती. कदाचित त्यांनी अशी टिप्पणी केली नसती तर बरे झाले असते. विविध समाज आणि गटांना एकत्र आणण्याचे काम सर्वजण करत होते. या (रामजन्मभूमी आंदोलनात) बाळासाहेबांची (शिवसेना प्रमुख बाळसाहेब ठाकरे) भूमिका आश्वासक आणि उपयुक्त होती. या आंदोलनात आम्ही त्यांचे स्वागत केले होते, त्यांचा आदर केला आहे आणि त्यांच्या (बाळसाहेब ठाकरेंच्या) विचारांचा आदर केला आहे.

एकनाथ शिंदे अटकेच्या भितीने मातोश्रीवर येऊन रडले ; आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

माजी मंत्री शेलार पुढे म्हणाले की, मला उद्धवजींना (उद्धव ठाकरे) विचारायचे आहे की संपूर्ण (बाबरी मशीद पाडण्याच्या) मोहिमेत त्यांची भूमिका काय होती? ते म्हणाले की बाबरी ढाचा पाडणे ही हिंदूंची उपजत प्रतिक्रिया होती असे भाजपचे मत आहे. पक्षाने याचे कोणतेही श्रेय घेतले नाही आणि आताही तशी मागणी नाही, असेही ते म्हणाले.

Tags

follow us