गेल्या काही दिवसापासून राज्यातील विधानसभा (Vidhansabha) आणि लोकसभा (Loksabha) एकत्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर मला वैयक्तिक दृष्ट्या दोन्ही निवडणूक एकत्र होतील असं वाटतं नाही, असं मत राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज व्यक्त केले.
नागपूर येथे आज काही कार्यक्रमानिमित्त शरद पवार आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर आणि वादावर मते मांडली. त्यावेळी लोकसभा आणि राज्यात विधानसभा एकत्र होण्याची चर्चा आहे, यावर प्रश्न विचारल्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावर लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्र होणार का ? यावर बोलताना ते म्हणाले की याची नक्की पार्श्वभूमी मला माहित नाही पण माझ्या अंदाजानुसार या दोन्ही निवडणूका एकत्र होतील असं वाटत नाही.
Donald Trump : पॉर्नस्टार, पैसा आणि डोनाल्ड ट्रम्प; डोनाल्ड ट्रम्प यांना अटक होणार? काय आहे प्रकरण
आज नागपुरात आल्यावर शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यावर देखील आजच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांना विचारलं गेलं की नितीन गडकरी यांची तुम्ही मागेही भेट झाली, आज देखील पुन्हा भेट झाली, भेटीमध्ये काय चर्चा झाली. त्यावर पवार यांनी ‘जेवण’ असं उत्तर दिलं. ते पुढे म्हणाले की त्यांनी मला जेवण दिल, त्यावरच चर्चा झाली.
त्यानंतर त्यांनी सांगितलं की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणेच्या नागपूर उपकेंद्रासाठी प्रस्तावित जागेसाठी भेट भेटली आणि त्यावरच चर्चा झाली. असं त्यांनी सांगितलं.