Download App

Assembly Session : छोट्या विक्रेत्यांना दोषी का धरता? बियाण्यांच्या मुद्द्यावर बाळासाहेब थोरात आक्रमक…

बियाण्यांच्या मुद्द्यावरुन गावातल्या छोट्या विक्रेत्यांना दोषी धरण्याचं कारणचं काय? असा सवाल उपस्थित करीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात बियाण्यांप्रकरणी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना प्रतिप्रश्न करीत थोरात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहेत.

कर्डिलेंनी फार तर फार सरपंचपदाबाबत बोलावं; थोरातांवर केलेल्या टीकेवरून तनपुरेंचा खोचक टोला

थोरात म्हणाले, बियाणे निर्मिती कंपनीच्या बियाण्यातच दोष असेल तर शेतकऱ्यांना हकनाक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कंपनीला दोषी ठरवायचे सोडून छोट्या विक्रेत्यांना दोषी धरलं जात आहे. मेडीकलमधून औषध घेतल्यानंतर औषध निर्मिती कंपनीवर आपण कारवाई करतो मेडिकल विक्रेत्यावर नाही, हादेखील असाच प्रकार आहे. आपण नाहक कृषी सेवा केंद्र चालकांवर गुन्हे दाखल करत आहात, छोट्या विक्रेत्यांवर दोषी धरण्याचं कारणंच काय? असं थोरात म्हणाले आहेत.

मीच संपादक, माझाच मुलाखतकार, माझीच मुलाखत… भन्नाट! ठाकरेंच्या मुलाखतीवर बानवकुळेंचा टोला

बीटी बियाण्यांशी संबंधित कायदा मी कृषीमंत्री असताना झाला. या माध्यमातून आम्ही बियाण्यांच्या किंमतीवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण करू शकलो. यासंदर्भात बऱ्याच कंपन्या न्यायालयात गेल्या, अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत केस चालली, मात्र तरीही राज्य सरकारचा कायदा टिकला असल्याचं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्य आणि केंद्र सरकारचा परवाना असलेल्या कंपन्यांचे बियाणे खराब निघते आणि आपण मात्र कृषी सेवा केंद्र चालकाला दोषी धरतो, त्याला आरोपी करतो हे कितपत योग्य आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.

Tags

follow us