Download App

Atul Bhatkhalkar : भाजपात आयारामांना पद तर, निष्ठावंतांचा वनवास?; भातखळकरांनी फोड करून सांगितलं

  • Written By: Last Updated:

Atul Bhatkhalkar : भाजपचे विधान परिषदेचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी भाजपमधील पक्ष प्रवेश करणारे आणि भाजपमधील मुळ कार्यकर्ते नेते यांच्याबद्दल आपली प्रतिक्रया दिली. त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, भाजपात आयारामांना पद तर, निष्ठावंतांचा वनवास होतो आहे का? त्यावर त्यांनी फोडच करून दाखवली आहे. सध्या राज्याचे हिवााळी अधिवेशन सुरू आहे. त्या दरम्यान लेट्सअप मराठीने भातखळकर यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रया दिली आहे.

भातखळकरांनी फोड करून सांगितलं…

भाजपात आयारामांना पद तर, निष्ठावंतांचा वनवास होतो. हा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. कारण त्यांना भाजपचं यश सहन होतं नाही. कारण जर असं असतं तर भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील हे लोकही भाजपचे निष्ठावान आणि वर्षानुवर्षे काम करणारे नेते आहेत. त्यांना देकील पद मिळालेली आहेत. त्यामुळे भाजपमध्ये निष्ठावान लोकांचा वनवास होत आहे. हे म्हणणं चुकीचं आहे.

स्वतःच्या स्वार्थासाठी पवारांनी खेळी केली; आरक्षणाचा इतिहास सांगत फडणवीसांनी सोडलं टीकास्त्र

तसेच पुढे भातखळकर म्हणाले की, पंकजा मुंडे यांचा पराभव हा दुर्देवाने झाला. त्यांना सध्या जरी काही पद नसले तरी त्या मध्यप्रदेशच्या प्रभारी आहेत. राष्ट्रीय सचिव आहेत. त्यांच्यावर देखील अन्याय झालेला नाही. तसेच त्या नुकत्याच झालेल्या शासन आपल्या या कार्यक्रमामध्ये भाजप आणि महायुतीच्या शासनाच्या मंचावर आल्या होत्या. त्यांनी भाषण देखील केलं. तसेच त्या नाराज नाहीत. मी देखील त्यांच्याशी संवाद साधत असतो.

Shah Rukh Khan : अबरामच्या DDLJ ची आयकॉनिक पोजने किंग खान झाला भावूक; Video Viral

तर आताचं तीन राज्यात भाजपने विजय मिळवला. त्यामध्ये मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री यादव हे देखील संघाचे कार्यकर्ते होते. नंतर भाजपचे काम पाहत होते. त्यामुळे भाजप निष्ठावान कार्यकर्त्यांनी संदी देतेच. मात्र भाजपचं यश सहन न झाल्याने विरोधक असे आरोप करत असातात. अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिली. त्यांनी अशा प्रकारे पक्षाच्या कारभाराची फोडच करून दाखवली.

Tags

follow us