Download App

Atul Londhe : राहुल गांधींवर बोलण्याची राणेंची ‘पात्रता’ नाही

  • Written By: Last Updated:

मुंबई : काँग्रेस नेते खा. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची तुलना दहशतवादी लादेन आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी करुन आमदार नितेश राणे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. राहुल गांधी यांच्यावर बोलण्याएवढी नितेश राणे (Nitesh Rane) यांची राजकीय उंची व पात्रता नाही, त्यांनी वाह्यात बडबड थांबवावी अन्यथा त्यांचे वस्त्रहरण त्यांच्याच भाषेत करु, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी दिला आहे.

याविषयी बोलतांना लोंढे म्हणाले की, नितेश राणे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वाह्यात बडबड केली त्यावरूनच त्यांची राजकीय अपरिपक्वता दिसून येते. दररोज कोणाला तरी अर्वाच्च शिव्या देण्यापलीकडे राणेंना काही येत नाही. राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलतात, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मुक्ताफळे नितेश राणे यांनी उधळली आहेत. राहुल गांधी हे सरकारी घरातच राहून देशाविरोधात बोलतात असेही नितेश राणे म्हणाले. राहुल हे दिल्लीत सरकारी घरातच राहताच, अंधेरीतील राणेंच्या राजमहालासारख्या अवैध बांधकाम केलेल्या घरात ते रहात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. कारण ते गांधी आहेत, राणे नाहीत, अशी टीका लोंढे यांनी केली.

Shubman Gill : ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक ठोकणाऱ्या शुभमनची सारा तेंडूलकरसोबत का होते चर्चा?

नेहरु-गांधी परिवाराने देशासाठी केलेला त्याग व बलिदान राणेसारख्या सुमार बुद्धीच्या लोकांना या जन्मीतरी समजणे शक्य नाही. नितेश राणेंनी राहुल गांधी यांची तुलना दहशतवादी लादेन, माफिया दाऊदशी केली. त्याच राहुल गांधींच्य हाताखाली नितेश यांचे पिताजी नारायण राणे यांनी दहा-बारा वर्षे काम केले आहे, याची त्यांना माहिती नाही का? नसेल तर नितेश यांनी वडिलांना विचारुन घ्यावे. नितेश राणे यांच्या बोलण्याला महत्व देण्याची फारशी गरज नाही. पण त्यांनी आमच्या नेत्यांबद्दल विचार करुन बोलावे अन्यथा आम्हालाही तुमच्याच भाषेत उत्तर देऊ, तेंव्हा तुम्हाला तोंड लपवायला जागा मिळणार नाही, हे लक्षात ठेवा, असा सज्जड इशारा लोढे यांनी दिला.

Tags

follow us