Bachchu Kadu : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी चष्मा (Pankaja Munde) घेतला आहे. काल त्यांनी स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. यावेळी त्यांनी आधी मला जवळचं नीट दिसत नव्हतं. आता मला चांगलं दिसायला लागेल, असेही म्हटले होते. आता याचे राजकीय अर्थही काढले जाऊ लागले आहेत. प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी यावर भाष्य केले आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याबाबत विचारले. पंकजा मुंडे यांचा घात जवळच्याच माणसाने केला असे खळबळजनक वक्तव्य बच्चू कडू यांनी केले.
Pankaja Munde : विधानपरिषदेचा फॉर्म भरला पण, मला.. पंकजांनी सांगितलं तेव्हा काय घडलं?
ते पुढे म्हणाले, पंकजा मुंडे यांचं बरोबर आहे. त्यांचा घात त्यांच्या जवळच्याच माणसाने केला आहे. त्यामुळे त्यांनी चष्मा बदलायला हवा होता. त्यांनी योग्य वेळी त्यांचा चष्मा बदलला आहे. आता त्या चष्म्यातून त्यांनी व्यवस्थित राजकीय लक्ष्य साधावं.
बातमी अपडेट होत आहे