Pankaja Munde : विधानपरिषदेचा फॉर्म भरला पण, मला.. पंकजांनी सांगितलं तेव्हा काय घडलं?

Pankaja Munde : विधानपरिषदेचा फॉर्म भरला पण, मला.. पंकजांनी सांगितलं तेव्हा काय घडलं?

Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) मागील काही दिवसांपासून भाजपात नाराज असल्याच्या चर्चा आहेत. पक्षाकडून त्यांना सातत्याने डावलले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात आहे. मध्यंतरीच्या घडामोडी पाहिल्या तर या चर्चांत तथ्य असल्याचेच जाणवते. आता तर त्यांच्या कारखान्यालाच जीएसटी विभागाची नोटीस आली. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच आता पंकजा मुंडे यांनी एका मुलाखतीत भाजपबाबत अनेक खुलासे केले आहेत.

पंकजा म्हणाल्या, विधानपरिषदेची दुसरी निवडणूक आली तेव्हा उमेदवार म्हणून माझा अर्ज वगैरे भरून घेतला होता. मला सांगण्यात आले की सकाळी फॉर्म भरायला या. मला सकाळी पक्षाकडून फोन आला की, तुम्ही फॉर्म भरू नका. विधानपरिषद निवडणूक झाली पण तेव्हा तर मी काही पत्रकार परिषद घेतली नाही. मी काहीच बोलले नाही. आता ही जेव्हा घटना घडली तेव्हा दोन गटांचा शपथविधी झाला. यानंतर चर्चा कशी निर्माण झाली असा सवाल करत या चर्चेला सामोरे जाणे माझे कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले.

Pankaja Munde : जर निवडणुकीत तिकीट दिलं नाही तर.. पंकजा मुंडेंचा भाजपला रोखठोक इशारा

माझ्या पराभवाची जबाबदारी मीच स्वीकारली

भाजपाची एक संस्कृती आहे. मला निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर मी त्याची जबाबदारी घेतली. दुसऱ्या कुणावर ढकललं नाही. पण, ज्यावेळी विधानपरिषदेची निवडणूक आली तेव्हा मला माहिती होतं की अशी पद्धत नाही. मग तेव्हा मला म्हटलं गेलं की ताई तुम्ही नेत्या आहात. तुम्ही तयारी ठेवा. मी म्हटलं ठीक आहे. तयारी म्हणजे तरी काय असतं. फॉर्म भरायचा, कागदपत्र तयार ठेवायचे. पण, नंतर सांगण्यात आलं की जे निवडणुकीत हरले आहेत त्यांना तिकीट देणार नाही. मी काही मागायला गेले नव्हते. मी म्हटलं ठीक आहे. मी पक्षाची शिस्तबद्ध कार्यकर्ती आहे, अशी आठवण पंकजा मुंडे यांनी सांगितली.

धनंजय मुंडेंसमोर आव्हान कुणाचं,  शरद पवार की पंकजाताई ?

त्यानंतर त्यांना धनंजय मुंडे यांच्यासमोर शरद पवार की पंकजाताईंचं आव्हान आहे असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पंकजा म्हणाल्या, धनंजय मुंडेंसमोर काय आव्हानं आहेत हे पहायला मला वेळ नाही. माझ्यासमोरच खूप आव्हानं आहेत. निवडणुकीचं गणित जर पाहिलं तर भाजपाच्या प्रमुख तीन नेत्यांना पडलेली मतं पहा आणि विभाजन झालेली मतेही पाहा. 15 हजार मतं विभाजित झाली असती आणि तिसरा उमेदवार असता तर माझ्यासाठी निवडणूक सहज होती.

Deepak Kesarkar : ..तर मी पालकमंत्रीपदाचा राजीनामा देईन; केसरकरांनी कुणाला दिलं चॅलेंज ?

लोकसभा निवडणूक लढणार का ?

आता लोकसभा निवडणूक लढणार की विधानसभा असे विचारले असता पंकजा म्हणाल्या, हे त्यावेळच्या परिस्थितीनुसार ठरत असतं. पण, मी आधीच स्पष्ट केलं आहे की खासदार प्रीतमची जागा मी घेणार नाही. प्रीतमला विस्थापित करून मी प्रस्थापित होणार नाही. पण, सध्या मी निवडणुकीचा विचार केलेला नाही.

राज्यात मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या राजकीय घडामोडींवरही त्यांनी भाष्य केले. परळी विधानसभा मतदारसंघावरील दावा सोडला का या प्रश्नावर त्या म्हणाल्या, माझं म्हणणं आहे की हा शपथविधी झाला. त्याचा निर्णय वरच्या लोकांनी घेतला. त्यांनी माझ्याबरोबर कोणतीही चर्चा केली नाही. मी आणि धनंजय मुंडे काही पक्षाचे प्रमुख नेते नाहीत की निवडणुकीत तिकीटांचे वाटप करू. पक्षश्रेष्ठींनी काही ठरवलं असेल तेव्हा काय करायचं ते पाहू.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube