Pankaja Munde : जर निवडणुकीत तिकीट दिलं नाही तर.. पंकजा मुंडेंचा भाजपला रोखठोक इशारा

Pankaja Munde : जर निवडणुकीत तिकीट दिलं नाही तर.. पंकजा मुंडेंचा भाजपला रोखठोक इशारा

Pankaja Munde : मागील काही दिवसांपासून भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या भाजपात नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यांनी आपली नाराजी याआधीही बोलून दाखवली आहे. भाजप (BJP) नेतृत्वाकडून त्यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा मध्यंतरी चर्चेत आला होता. तसेत त्यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर झालेली कारवाईनेही उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. पंकजा मुंडे आता राजकारणात वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे. त्यातच त्यांनी एका मुलाखतीत विधानसभेच्या तिकीटावरून थेट भाजपालाच आव्हान दिलं आहे.

राणे-वडेट्टीवार वादात मुनगंटीवारांची उडी; म्हणाले, वक्तव्य करताना नेहमी..

या मुलाखतीत त्यांना आगामी 2024 मधील निवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यावर पंकजा म्हणाल्या, 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न देणे हा कोणत्याही राजकीय पक्षासाठी चांगला निर्णय ठरणार नाही. माझा पक्ष मला निवडणुकीत का उतरवत नाही माझ्यासारख्या उमेदवाराला तिकीट न देणं हा कोणत्याही पक्षासाठी चांगला निर्णय ठरणार नाही. त्यांनी असा निर्णय घेतला तर त्यांना लोकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.

2019 च्या निवडणुकीत पंकजांचा पराभव

मागील 2019 च्या निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ होता आणि भाजपाच्या विरोधात होता. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. राष्ट्रवादीतील अजित पवार गट भाजपबरोबर सत्तेत आहेत. या सरकारमध्ये धनंजय मुंडे कृषीमंत्री आहेत. आता आगामी निवडणुका भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गट एकत्रित लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. असे झाले तर परळी मतदारसंघाचं काय होणार?, जागावाटपात हा मतदारसंघ कुणाकडे जाणार? असे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळेच पंकजा मुंडे यांनी दिलेल्या या इशाऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.

Eknath Shinde : 2024 लाही शिंदेच CM! बांगरांनी घेतला नवसाचा मोदक

मी कोणताही नवा मतदारसंघ शोधणार नाही 

मी कोणताही नव्या मतदारसंघाच्या शोधात नाही. तसेच मी खासदार प्रीतम मुंडे यांचीही जागा घेणार नाही. यानंतर त्यांनी वैद्यनाथ साखर कारखान्यावरील कारवाईवरही भाष्य केले. पंकजा म्हणाल्या, कारखान्याला जीएसटी विभागाकडून नोटीस मिळाली आहे. ही नोटीस दोन ते तीन महिन्यांपूर्वीही आली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube