Download App

फडणवीसांनी तुम्हाला महायुतीतून बाहेर काढलं? बच्चू कडू म्हणाले, ‘मी त्यांचा आभारी…’

  • Written By: Last Updated:

Bachchu Kadu on Devendra Fadnavis : अमरावतीत नवनीत राणा (Navneet Rana) यांना भाजपने (BJP) उमेदवारी दिली. मात्र, त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचे आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) आणि प्रहारचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी जोरदार विरोध केला. इतकचं नाही तर बच्चू कडूंनी अमरावतीत प्रहारकडून उमेदवार उभा केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दर्यापूरमध्ये नवनीत राणांसाठी प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी बच्चू कडूंचा उल्लेख करणं टाळलं. त्यावर आता बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली.

इंडिया आघाडीचे प्रत्येक इंजिन वेगळ्या दिशेने, त्यात तुम्हाला जागा नाही…; फडणवीसांचे टीकास्त्र 

फडणवीसांनी आपल्या भाषणात महायुतीतल्या सर्व प्रमुख नेत्यांचा आणि घटक पक्षांचा उल्लेख केला. मात्र बच्चू कडू आणि त्यांच्या पक्षाचा उल्लेख करणं टाळलं. त्यामुळं बच्चू कडूंच्या पक्षाला महायुतीतून बाहेर काढल्याची चर्चा रंगू लागली आहे. याविषयी बच्चू कडूंना विचारले असता ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी आमचा उल्लेख केला नाही, आमच्या पक्षाचे नाव घेतले नाही याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी आमचे नाव घेतलं नाही ते बरं झालं. कारण, त्यांनी आमचं नाव घेतलं असतं तर लोकांच्या मनात शंका निर्माण झाली असती. त्यामुळे त्यांनीन आमचंचं काम केलं.

खडसेंच्या भाजप प्रवेशासह गिरीश महाजनांद्दल पवारांच मोठ विधान, म्हणाले मी बोललो तर… 

पुढं बोलतांना बच्चू कडू म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच वर्ध्यात सभा झाली. त्या सभेत ते म्हणाले होते की, तुमची उमेदवाराबाबत नाराजी असेल तर तुम्ही माझ्याकडे बघून मतदान करा. म्हणजेच आमचा उमेदवार सक्षम नाही, आमचा उमेदवार काहीही करू शकत नाही, असंचं मोदींना सांगितलं. भाजपचा उमेदवार सक्षम नसल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाल्याचं मोदी म्हणाले.

दरम्यान, बच्च कडू गेल्या काही महिन्यांपासून महायुतीवर नाराज आहेत. त्यांनी अनेकदा आपली नाराजी बोलून दाखवली. ते सातत्याने भाजपावर आणि भाजपाच्या नेत्यांवर टीका करताना दिसत आहेत. तसेच अमरावतीत बच्चू कडू आणि खासदार नवनीत रणा यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष चालू आहे. आताही कडूंनी राणा यांच्या विरोधात दिनेश बूब यांनी उमेदवारी दिली. त्यामुळं अमरावती लोकसभा मतदारसंघात कोणाचा विजय होतो, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us

वेब स्टोरीज