Bacchu Kadu : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर (Vaidyanath Cooperative Sugar Factory)रविवारी जीएसटी(GST) विभागाने कारवाई केली. त्यावेळी तब्बल 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावरील कारवाईमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. विरोधकांकडूनही या कारवाईवरुन जोरदार निशाणा साधला आहे. त्याचबरोबर प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू(Bacchu Kadu) यांनी या कारवाईवरुन पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांनी यात्रा काढली आणि त्या महाराष्ट्रात फिरल्यामुळेच त्यांच्यावर कारवाई झाली, असा थेट आरोप आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर केला आहे.
आंबेडकरांची मोठी घोषणा; महाविकास आघाडीचे टेन्शन वाढणार, लोकसभेचं गणित बिघडणार?
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना एक प्रकारे जीएसटी विभागाने मोठा दणकाच दिला आहे. अमरावतीमध्ये आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती यात्रा काढली. पंकजा मुंडे स्वतः महाराष्ट्रामध्ये फिरल्या. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई सुरु झाली असावी, असं आमदार बच्चू कडू म्हणाले.
‘राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादाच, कारवाईची चिंता नाही’; अनिल पाटलांनी शरद पवार गटाला ठणकावलं…
केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने सहा महिन्यांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर छापा टाकून काही कागदपत्रांची तपासणी केली होती. त्यात या कारखान्याने 19 कोटी रुपयांचा जीएसटी कर बेकायदेशीरपणे बुडवल्याचं स्पष्ट झाले. त्यानंतर काल औरंगाबाद येथील जीएसटी आयुक्तालयाने या कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे आहेत. वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर झालेली कारवाई हा पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. जीएसटी विभागाच्या या छाप्याने एकच खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद येथील जीएसटी आयोगाच्या आयुक्त कार्यालयाच्या पथकाने वैद्यनाथ कारखान्याला जीएसटी कराबाबत वारंवार नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, जीएसटी प्राप्त झालेल्या या नोटिसांना कोणताही प्रतिसाद न दिल्याने काही अधिकाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांपूर्वी कारखान्याला अचानक भेट देऊन काही कागदपत्रे ताब्यात घेतली होती. साखर कारखान्यातील आर्थिक व्यवहाराची अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली होती. यात या कारखान्याने 19 कोटी रुपयांचा जीएसटी कर बेकायदेशीरपणे बडवल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पोलिसांनी कारखान्यातील बॉयलर हाऊस आणि इतर मशिनरीसह 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. या मालमत्तेचा लिलाव करून हा कर वसूल केला जाणार असल्याचे समजते.
पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील छुपा वाद लपून राहिलेला नाही. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे वैद्यनाथ कारखान्यावर झालेल्या कारवाईबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.