‘राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादाच, कारवाईची चिंता नाही’; अनिल पाटलांनी शरद पवार गटाला ठणकावलं…
Anil Patil On Sharad Pawar Group : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारच(Ajit Pawar), त्यामुळे कारवाईची चिंता नाही, या शब्दांत अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील(Anil Patil) यांनी शरद पवार गटाला ठणकावलं आहे. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता नागालॅंडमधील आमदारांवर कारवाईची मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आलीयं, या कारवाईनंतर अनिल पाटलांनी शरद पवार गटाला इशारा दिला आहे. जळगावमध्ये अनिल पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
Ghungru Movie: गौतमी पाटीलच्या सिनेमाची पहिली झलक पाहिलात का? ‘या’ दिवशी होणार रिलीज
मंत्री अनिल पाटील म्हणाले, अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष, त्यामुळे कारवाईची चिंता करू नका, अजितदादा जे ठरवतील त्यानुसार कारवाईला सामोरे जावे लागेल, असे म्हणत मंत्री अनिल पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला आव्हान दिलं आहे. सध्या राज्यात अजित पवार गटाच्या विधानसभेतील आमदारांचा अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे कारवाई सुरू आहे, अशातच आता नागालँडमध्ये देखील शेड्युल 10 अंतर्गत आमदारांवर कारवाईची मागणी शरद पवार गटाने केली.
Siddharth Jadhav: सिद्धार्थचा ‘आता होऊ दे धिंगाणा २’ लवकरच येणार भेटीला; Promo Viral
नागालॅंडमधील राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा जाहीर केला. हे आमदार सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून तीन दिवसीय दौऱ्यात ते अजित पवारांची भेट घेणार आहेत. नागालँडचे आमदार मुंबई दौऱ्यावर असताना आमदारांविरोधात शरद पवार गटाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली. नागालँडचे विधानसभा अध्यक्ष यांना शरद पवार गटाने काही दिवसांपूर्वी पत्र लिहिले. या पत्रात सत्तेत सहभागी सात आमदारांनी अजित पवार गटासोबत जाऊन पक्षविरोधी कृती केल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.
पंकजा मुंडेंना मोठा धक्का, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटीचा छापा, 19 कोटींची मालमत्ता जप्त
नागालँडचे प्रदेशाध्यक्ष एस तोईहो येपथो म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागालँडचे आमदार पहिल्यांदाच मुंबईत आले आहेत. निवडून आल्यावर हा पहिलाच मुंबई दौरा आहे. तीन दिवसीय दौऱ्यात मंगळवारी घेणार अजित पवारांची भेट घेणार आहेत. शरद पवारांची भेट होण्याची शक्यता कमी आहे. या दौऱ्यात आगामी लोकसभा निवडणुकीसह इतरही मुद्द्यांवर करणार चर्चा करण्यात येणार आहे.
दरम्यान, नागालॅंडच्या आमदारांवर कारवाईचा पवित्रा घेतल्यानंतर अजित पवार गटाकडूनही जोरदार टीका करण्यात येत आहे. अनिल पाटील यांनी केलेल्या या टीकेवरुन आता शरद पवार गटाकडून काय भूमिका घेतली जाणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.