Ghungru Movie: गौतमी पाटीलच्या सिनेमाची पहिली झलक पाहिलीत का? ‘या’ दिवशी होणार रिलीज

Ghungru Movie: गौतमी पाटीलच्या सिनेमाची पहिली झलक पाहिलीत का? ‘या’ दिवशी होणार रिलीज

Gautami Patil: ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ (Gautami Patil) तसेच लावणी क्वीन ही कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहते. कधी टीव्हीवर तर कधी सोशल मीडियावर (Social media) तीच्या प्रत्येक गोष्टीची काहींना काही चर्चा सुरूच असते. (Release Date Out) गौतमी सिनेमात एन्ट्री करणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. (Ghungaroo Marathi Movie) गौतमी आता लवकरच मनोरंजन क्षेत्रातही पदार्पण करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gautami Patil (@official_gautami941__)


गौतमी लवकरच एका मराठी सिनेमात दिसणार आहे. तिच्या या सिनेमाचं नाव घुंगरू असं आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहते या सिनेमाची वाट बघत आहेत. आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख देखील घोषित करण्यात आली आहे. सध्या गौतमीचा पहिला मराठी सिनेमा घुंगरू हा पुढच्या महिन्यामध्ये प्रदर्शित करणार असल्याची माहिती मिळाली आहे. नुकतंच घुंगरू सिनेमाचे निर्माते बाबा गायकवाड यांनी पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घेतले आहे.

घुंगरू या सिनेमाचे चित्रकरण देखील आता पूर्ण झाले आहे आणि चित्रीकरण पूर्ण झाल्यावरच विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण कलाकारांची टीम एकत्र येऊन साकडं घातले आहे. यावेळी घुंगरू सिनेमाचे निर्माता बाबा गायकवाड यांनी या सिनेमात कलाकारांच्या आयुष्याची व्यथा काय आहे? याबद्दल सिनेमा आहे, तो सिनेमा चाहत्यांनी सिनेमागृहात जाऊन नक्की बघावा असे यावेळी त्यांनी सांगितले आहे.

Subhedar नंतर दिग्पाल लांजेकरांचा आगामी सिनेमा ‘शिवरायांचा छावा’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

तसेच गौतमी पाटील येणाऱ्या काळामध्ये ‘घुंगरू’ या सिनेमात दिसणार आहे. हा तिचा पहिला सिनेमा असणार आहे. या सिनेमातून ती पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे. लोककलावंताच्या जीवनावर आधारित हा रंजक असा सिनेमा असणार आहे. या चित्रपटबद्दल बोलत असताना गौतमी म्हणाली आहे की, ‘माझा घुंगरू हा सिनेमा येणार आहे. कलाकाराच्या आयुष्यावर आधारितच हा सिनेमा असणार आहे.

मी याबद्दल अधिक बोलण्यापेक्षा प्रत्येकाने हा सिनेमा जाऊन पाहा. खूपच छान पिक्चर आहे.’’ असं मत तिने यावेळी व्यक्त केल्याचे बघायला मिळाले आहे. गौतमीच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर गेल्या काही दिवसांपूर्वी ‘घुंगरू’ चा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. लोककलावंताच्या जीवनावर आधारित हा सिनेमा राहणार आहे. बाबा गायकवाड यांनी हा सिनेमा दिगदर्शित केला आहे. या सिनेमात गौतमी पाटीलची मुख्य भूमिका असणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube