Balasaheb Thorat News : सरकारमधली परिस्थिती पाहता गृहमंत्री असलेले उपमुख्यमंत्री अगोदर मुख्यमंत्री होते, दुसरे एक उपमुख्यमंत्री त्यांनाही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. सध्याची परिस्थिती पाहिलो तर राज्यातील या सत्ताधाऱ्यांमध्ये असलेल्या अनेकांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा असून सध्या त्यांच्यामध्ये सत्ता स्पर्धा सुरू असल्याने त्यांचे राज्यातील जनतेकडे दुर्लख होत असल्याची खोचक टीका यावेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
राज्यात गुंडगिरी वाढली असून त्याचा परिणाम दिसून येत आहे. सरकारमध्ये सर्व महत्वकांक्षी नेते पदावर आले असून त्यांचातच मेळ बसत नसल्याने त्यांचा प्रशासनावर आणि पोलिसांवर धाक राहिलेला नाही. यातून राज्यातील हत्या,खून, दहशत आदी प्रकार पूढे येत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे जेष्ठनेते आ.बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
Chhagan Bhujbal : तू खरच पाटील असशील तर मंडल संपवून दाखव; भुजबळांचं जरांगेंना आव्हान
यावेळी बोलताना थोरात पुढे म्हणाले की, राज्यातली गुंडगिरीने इतका कळस केला आहे की अक्षरशः थंड डोक्याने मीडियासमोर लाईव्ह सुरू असताना घोसाळकर नावाच्या माजी नगरसेवकावर एक गुंड गोळ्या घालून हत्या करतो. एक भाजपचा आमदार आपल्याच सहकारी पक्षाच्या कार्यकर्त्यावर थेट पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतोय. राज्यकर्ते आणि त्यांचे सहकारीच गुन्हेगार म्हणून समोर येताना दिसत असल्याचे चित्र राज्यासाठी धोकादायक आहे.
“सेटलमेंट होईपर्यंत यायचं नाही” : गायक सुरेश वाडकर यांना धमकावत 20 कोटींच्या खंडणीची मागणी
गुंडांमध्ये सरकार आपलेच आहे त्यामुळे अशी भावना झाली असून त्यावर पोलिसांची कसलीही जरब दिसून येत नाही. एकूणच राज्यातील कायदा-सुव्यवस्था परस्थितीवर सरकारचे नियंत्रण दिसून येत नसून सर्वसामान्य जनता घाबरलेली आणि दहशतीखाली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे जेष्ठनेते आ.बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांमध्ये सध्या भाजपला पराभूत करण्यासाठी वेगवेगळ्या मतदारसंघात कोणता उमेदवार विजयी होऊ शकतो, याचा विचार सुरु आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावर अद्याप चर्चा सुरु झालेली नाही. जागांच्या संख्यांबाबत कोणता उमेदवार निवडून येईल या चर्चेवर आम्ही अधिक भर देत असल्याचंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहे.