Chhagan Bhujbal : तू खरच पाटील असशील तर मंडल संपवून दाखव; भुजबळांचं जरांगेंना आव्हान

Chhagan Bhujbal : तू खरच पाटील असशील तर मंडल संपवून दाखव; भुजबळांचं जरांगेंना आव्हान

Chhagan Bhujbal : मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे (Manoj jarange) यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना एक आव्हान दिले आहे. भुजाबळ म्हणाले की, ‘जरांगे तू खरच पाटील असशील तर मंडल संपवून दाखव.’ भुजबळ हे माध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

हेमंत सोरेन यांची बीएमडब्ल्यू धीरज साहूंच्या नावावर; ईडीचा दावा!

भूजबळ म्हणाले की, जरांगे पाटील स्वतःला काय समजतो आणि काय नाही. प्रत्येक वेळी सरकारला अल्टिमेटम देतात. ही लोकशाही आहे की, हुकूमशाही आहे. तसेच मी राजीनामा दिला. यावर विश्वास नसेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाऊन विचारा की, मी खरच राजीनामा दिला होता की नाही.

दिशाभूल करून प्रतिज्ञापत्र घेतले, अमोल कोल्हेंसह पाच आमदारांचा अजितदादांवर आरोप

तसेच तुझ्यामध्ये हिंमत असेल आणि तू खरच पाटील असशील तर जरांगे तू मंडल आयोगाच्या विरुद्ध जाऊन मंडल आयोग संपवून दाखव. तसेच तुला एवढी अक्कल पाहिजे की, तुला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे आणि त्याच ओबीसी आरक्षणाचा निर्माता मंडल आयोग संपवायला निघाला आहे. मग ओबीसीमध्ये कसे काय राहणार? अशा कठोर शब्दांत भुजबळ यांनी जरांगे यांना सुनावलं आहे.

‘खोट्या कुणबींना ओबीसीत घुसवलयं’; छगन भुजबळांचा थेट आरोप…

तसेच राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर राज्य सरकारकडून कुणबीच्या नोंदी सापडण्यासाठी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून अनेक कुणबी नोंदी असलेले पुरावे सापडले आहेत. राज्यभरातून 54 लाख नोंदी आढळून आल्याचा दावा केला जात आहे.

त्यावर छगन भुजबळ म्हणाले, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कार्यक्रम जो शुक्रिया आयोगाकडून सुरु आहे. त्याला स्वरुप देण्याचं काम होणार आहे. राज्य सरकारकडून येत्या 15 किंवा 16 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावून कायदा पारित करण्याच्या हालचाली सुरु असून आमचा त्याला पाठिंबा आहे. मात्र, खोटे कुणबी, वेगैरे ओबीसीत घुसवले आहेत त्यांना वेगळ्या आरक्षणात टाका, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube