Manoj Jarange : ते राष्ट्रपती झाले तरी आम्ही ओबीसीतूनच आरक्षण मिळवू; जरांगेंच भुजबळांना पुन्हा एक चॅलेंन्ज
Manoj Jarange : राज्य सरकारने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या मागण्या मान्य करत मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) अधिसूचना काढली आहे. मात्र सगेसोयऱ्यांसंदर्भात कायदा तयार करण्यासाठी तातडीने ड्राफ्ट तयार करण्याचे काम सुरू करावे, या मागणीसाठी येत्या 10 फेब्रुवारीपासून आंतरवाली सराटीत जरांगे पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार आहेत. त्या अगोदर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करत त्यांना आव्हान केले आहे. जरांगे म्हणाले की, ते राष्ट्रपती जरी झाले तरी आम्ही ओबीसीतूनच आरक्षण मिळवू.
Lata Mangeshkar : …म्हणून लता दीदी आयुष्यभर राहिल्या अविवाहित, स्वत:च सांगितलेले कारण
माध्यमांनी जरांगे यांना भुजबळांवर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, भुजबळांबद्दल मला प्रश्नच विचारत जाऊ नका. त्यांना मी बेरजेतच धरत नाही. ते स्वतःला ओबीसींचे नेते म्हणून घेतात आणि दुसरीकडे नाभिक समाजाचा अपमान करतात. त्यामुळे त्यांनी माफी मागावी जर त्यांनी माफी मागितली नाही. तर ओबीसी बांधव समजून घेतील की त्यांना नाभिक समाजाचा अपमानच करायचा होता.
Jayant Patil : लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र होऊ शकतात : जयंत पाटील म्हणाले, तयारीला लागा
तसेच त्यांनी राजीनामा देखील दिला नसेल. त्याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही. भुजबळ कोणत्याही पदावर जावोत पण आम्ही आरक्षण ओबीसीमधूनच घेणार. त्यांना राष्ट्रपती होऊ दे, सगळे अधिकार त्यांच्या हातात येऊ दे तरीही आम्ही ओबीसीतूनच आरक्षण मिळवून दाखवणार. मात्र भुजबळ हे राष्ट्रपतीच काय ग्रामपंचायत सदस्य ही होणार नाहीत. त्यामुळे त्यांनी आता तलाठी व्हावं. असा खोचक सल्लाही जरांगे यांनी भुजबळांना दिली.
Gypsy Movie: शशि चंद्रकांत खंदारे दिग्दर्शित ‘जिप्सी’ चित्रपट आता लवकरच होणार प्रदर्शित
तसेच यावेळी जरांगे यांनी आंदोलनाची माहिती दिली. तसेच मोर्चातून काहीच साध्य झाले नाही अशी टीका करणाऱ्यांचाही समाचार घेतला. ते पुढे म्हणाले, काही जण स्वतःला अभ्यासक आणि समाजाचे नेते म्हणून मिरवून घेत आहेत. आंदोलनाला काही जण विरोध करत आहेत. परंतु, मागासवर्ग आयोग स्थापन झाला हे या आंदोलनाचे यश नाही का? असा सवाल त्यांनी केला. मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी डाव रचला जात असून यात विरोधक आणि सत्ताधारी दोघेही सहभागी आहेत. या आंदोलनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील नेत्यांचा हात असल्याचे सांगितले गेले परंतु या आंदोलनात फक्त आणि फक्त मराठा समाजाचा हात आहे, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.