बाळासाहेब थोरातांना दुखापत; ट्विट करत दिली माहिती

नागपूर : ‘आज सकाळी नागपूरच्या सेमिनरी हिल येथे मॉर्निंग वॉक करताना पडल्यामुळे माझ्या खांद्याला दुखापत झाली आहे. मी नागपूर येथे प्राथमिक उपचार घेतले आहेत. माझी तब्येत पूर्णपणे बरी असून काळजी करण्याचे कारण नाही. मी पुढील उपचार फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने मुंबईत घेणार आहे.’ अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. यात […]

WhatsApp Image 2022 12 26 At 2.53.52 PM

WhatsApp Image 2022 12 26 At 2.53.52 PM

नागपूर : ‘आज सकाळी नागपूरच्या सेमिनरी हिल येथे मॉर्निंग वॉक करताना पडल्यामुळे माझ्या खांद्याला दुखापत झाली आहे. मी नागपूर येथे प्राथमिक उपचार घेतले आहेत. माझी तब्येत पूर्णपणे बरी असून काळजी करण्याचे कारण नाही. मी पुढील उपचार फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने मुंबईत घेणार आहे.’ अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

यात बाळासाहेब थोरात यांच्या दुखापत झाली. या अपघाताची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. बाळासाहेब थोरात हे सध्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला गेले आहेत. दरम्यान आता ते पुढील उपचार फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने मुंबईत घेणार आहेत. सध्या त्यांनी नागपूर येथे प्राथमिक उपचार घेतले आहेत. त्यांचा तब्येत पूर्णपणे बरी आहे.

यंदाच्या हिवाळी अधिवेशनात प्रकृतीच्या कारणाने रुग्णालयात जाणारे थोरात हे अहमदनगर जिल्ह्यातील दुसरे आमदार ठरले आहेत. मागील आठवड्यात श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांना विधानसभेच्या सभागृहातच श्वसनाचा त्रास झाला. त्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेत टाकून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पावसाळी अधिवेशनाच्या वेळी माजी मंत्री शंकरराव गडाख यांना मणक्याचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

Exit mobile version