Download App

Balasaheb Thorat : .. तर त्यांचे सरकार पडले नसते; बाळासाहेब थोरातांचा फडणवीसांना टोला

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबरोबर चर्चा करूनच आम्ही राष्ट्रवादीसोबत (NCP) सरकार स्थापन करून शपथविधी केला, असे वक्तव्य करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षातील नेत्यांसह अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यानंतर आता माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘शरद पवार यांना विचारून जर शपथविधी झाला असता तर सरकार कोसळलेच नसते,’ असे थोरात म्हणाले.

Rohit Pawar : हे तर जयंत पाटलांवरच प्रेम... | LetsUpp Marathi

ते पुढे म्हणाले, की ‘शरद पवार यांच्या सहमतीने हे झाले नाही,असे माझे मत आहे. भाजपकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्यावेळी त्यांना मुख्य मुद्द्यांना हात घालायचा नसतो तेव्हा ते अशा पद्धतीने जनतेची दिशाभूल करतात.’ नाराजीनाट्यावर पत्रकारांनी त्यांना विचारले असता ते म्हणाले, की ‘माझ्या नाराजीच्या चर्चा या मला प्रसारमाध्यमांमार्फत कळल्या. मी नाराज नव्हतोच, प्रत्येक संघटनेत पत्रव्यवहार सुरू असतो. तसा आम्ही केला होता,’ असे थोरात म्हणाले.

दरम्यान, नाशिक पदवीधर निवडणुकीत घडलेल्या राजकीय घडामोडींवर थोरात कमालीचे मौन बाळगून होते.निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी सांगितले, की मी नाराज नव्हतो. प्रसारमाध्यमांतूनच तशा चर्चा सुरू होत्या.दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही बाळासाहेब थोरात आणि माझ्यात कोणताच वाद नसल्याचे म्हटले. तसेच त्यांनी कोणतेही पत्र किंवा राजीनामा दिला नसल्याचेही स्पष्ट केले.

Tags

follow us