Download App

‘बाळासाहेब थोरात भाजपात येणार होते, आले तर स्वागतच’; मंत्री विखेंचा खळबळजनक दावा

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात स्वत: भाजपात येणार होते, असा खळबळजनक दावा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केला आहे.

Image Credit: letsupp

Radhakrushna Vikhe Patil On Balasaheb Thorat : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) स्वत: भाजपात येणार होते, असा खळबळजनक दावा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe Patil) यांनी केला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचं वातावरण पेटलेलं असतानाच विखे पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यात वाकयुद्ध सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता राधाकृष्ण विखे यांनी थोरातांबद्दल खळबजनक दावा केल्याने राज्यातील राजकारणात एकच चर्चा रंगलीयं. विखे पाटील आज संगमनेर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंसह, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यावर सडकून टीका केलीयं.

अधर्माच्या आधारावर राम मंदिराचे काम, सत्तेत आल्यावर मंदिराचे शुद्धीकरण करू; पटोलेंचे मोदींना प्रत्युत्तर

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, बाळासाहेब थोरात यांना एवढं गंभीर घेण्याची गरज नाही. थोरात सध्या दिवसा मातोश्री, संध्याकाळी सिल्वर ओकवर आणि रात्री भाजपच्या लोकांसोबत असतात, अशी सध्या त्यांची अवस्था आहे. त्यामुळे थोरात यांना कोणी गांभीर्याने घेत नाहीत. मुळात बाळासाहेब थोरात यांची भाजपात येण्याची इच्छा होती पण भाजपमध्ये त्यांना कोणी घेत नाहीत, असा दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलायं.

राहुल गांधींच्या गाईडकडून देशवासीयांचा अपमान; पित्रोदांच्या वर्णभेदी वक्तव्याचा मोदींकडून समाचार

थोरात भाजपात आले तर स्वागतच…
बाळासाहेब थोरात यांना भाजपात यायची इच्छा असल्याचा दावा राधाकृष्ण विखे यांनी केलायं. त्यानंतर थोरात भाजपात आले तर स्वागत करणार का? असा सवाल माध्यमांकडून विखेंना करण्यात आला. त्यावर बोलताना विखे म्हणाले, बाळासाहेब थोरात भाजपात आले तर स्वागतच आहे, त्यांचे आजच भाजपासोबत आतून संबंध प्रस्थापित झाले आहेत फक्त औपचारिकता बाकी असल्याचं विखेंनी स्पष्ट केलंय.

एकही उमेदवार निवडून येणार नसल्याने शरद पवार हतबल :
आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचं विधान शरद पवार यांनी केल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच चर्चा रंगली. त्यावर बोलताना विखे पाटील म्हणाले, राष्ट्रीय पक्ष म्हणून ते आज देशात भाजपला पर्याय द्यायला निघाले आहेत. पवारांच्या लक्षात आलंय की आपला एकही उमेदवार निवडून येणार नाही. त्यामुळे ते हतबल झालेले आहेत. आम्ही त्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी बोललेलं चांगलं राहिल. शरद पवार यांचे कोण सहकारी राहिले आता खरी राष्ट्रवादी अजित पवारांची आमच्यासोबत आहे. शरद पवारांनी 1999 साली काँग्रेस पक्ष सोडला तेव्हा विदेशी मुद्दा होता, त्यामुळे आता अशी काय उफाळी झाली ते पुन्हा काँग्रेसमध्ये हात मिळवणी करत आहेत. शरद पवार यांच्या भूमिकेत सातत्य नाही, म्हणूनच त्यांची अशी अवस्था असल्याची सडकून टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केलीयं.

नाना पटोलेंनी चिंता करण्याची कारण नाही शरद पवार काँग्रेसध्ये गेले तर नाना पटोले पुन्हा भाजपात येतील, अशी मिश्किलपणे टिप्पणीही विखे पाटलांनी नाना पटोले यांच्यावर केलीयं. दरम्यान, राज्यात 40 पेक्षा अधिक जागा एनडीए जिंकणार असून शिर्डी आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्क्याने महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही विखे पाटलांनी व्यक्त केलायं.

follow us

वेब स्टोरीज