राहुल गांधींच्या गाईडकडून देशवासीयांचा अपमान; पित्रोदांच्या वर्णभेदी वक्तव्याचा मोदींकडून समाचार
PM Modi Criticize Sam Pitroda for his colour discrimination statement : काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा ( Sam Pitroda) यांनी भारतीयांच्या दिसण्यावरून वादग्रस्त विधान केले. त्यावर पंतप्रधान मोदी ( PM Modi ) यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. मोदी म्हणाले की, शहजादे राहुल गांधींच्या सल्लागाराने जे म्हटलं त्याचा मला राग आलाय. हा माझ्या देशातील लोकांच्या कातडीच्या रंगाचा अपमान आहे.
TISS मध्ये नोकरीची संधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला ७५ हजार रुपये मिळणार पगार
पंतप्रधान मोदी सध्या तेलंगानामध्ये प्रचार कार्यामध्ये व्यस्त आहेत. त्या दरम्यान त्यांनी काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा ( Sam Pitroda) यांनी भारतीयांच्या दिसण्यावरून वादग्रस्त विधान केले. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज मला कळालं की, काँग्रेसचे राजपुत्र राहुल गांधी हे अमेरिकेत राहणारे त्यांचे अंकल आणि फिलॉसॉफर गाईड सॅम पित्रोदा यांच्याकडून क्रिकेटमधील थर्ड एम्पायर प्रमाणे सल्ले घेतात.
‘प्रादेशिक पक्षांना काँग्रेस हाच पर्याय’; शरद पवारांच्या भाकीतावर नाना पटोलेंचं मोठं विधान
तसेच मला कोणी शिव्या दिल्या तरी मला राग येत नाही. मात्र आज मला या राजपुत्राच्या सल्लागाराने माझ्या देशातील लोकांच्या त्वचेच्या रंगावरून जे काही वक्तव्य केलं आहे. त्याचा मला प्रचंड राग आला आहे. या लोकांकडून संविधानाचा मुद्दा गाजवला जातो. मात्र दुसरीकडे देशातील लोकांचा त्यांच्या त्वचेच्या रंगावरून अपमान केला जातो. त्यामुळेच त्यांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनाही आफ्रिकन समजून पराभूत करण्याचा प्रयत्न केला. मात्र या देशात त्वचेच्या रंगाने काहीही फरक पडत नाही. आम्ही आमच्या सारख्याच रंगाच्या श्रीकृष्णाची पूजा करतो.
काय म्हणाले होते सॅम पित्रोदा?
‘द स्टेट्समन’ला दिलेल्या मुलाखतीत पित्रोदा भारतातील विविधतेबद्दल बोलत होते. त्यावेळी त्यांनी पूर्वेकडील लोक चीनसारखे, पश्चिमेकडील लोक अरबांसारखे आणि उत्तरेकडील लोक बहुधा गोऱ्यांसारखे आणि दक्षिणेकडील लोक आफ्रिकन लोकांसारखे दिसतात असे सांगितले. पित्रोदा यांच्या या विधानानंतर एकीकडे राजकारण तापलेले असताना काँग्रेसने मात्र या विधानावर काँग्रेसच्या नेत्यांनी कोणताही बाजू घेतल्याचे दिसून येत नाहीये. याबाबत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी पित्रोदा यांनी भारताची विविधता दाखवण्यासाठी केलेली तुलना अत्यंत दुर्दैवी आणि अस्वीकार्य असून, काँग्रेस पक्ष पित्रोदा यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे म्हटले आहे.