Sharad Pawar on NCP rebellion : अलिकडच्या काळात काही लोकांना वेगळी भूमिका घेतली. बारामतीकरांनी अनेक निवडणुका पाहिल्या. त्यामध्ये माझ्या, सुप्रियाच्या आणि अजित पवारांच्या पाहिल्या. (Sharad Pawar) या सर्व निवडणुका एकत्र आपण पाहिल्या. सर्व उमेदवारांना एक चिन्ह असते. तसं, आम्ही पक्ष काढला राष्ट्रवादी. त्याला चिन्ह मिळाल घड्याळ. या पक्षातून अनेक लोक निवडून गेले. मोठे झाले. दरम्यान, हा पक्ष कुणी काढला? असा प्रश्न उपस्थित करत शरद पवारांनी अजित पवारांवर जोरदार घणाघात केला.
हा पक्ष आमचा असा दावा या लोकांनी केला. मी आयुष्यात कोर्टात गलो नाही. परंतु, या खटल्यात कोर्टात जावं लागलं. दरम्यान, या प्रकरणात न्यायालयाने समन्स काढलं की शरद पवारांच्या नावाने काढलं. मला समन्स आलं मी कोर्टात गेलो. दिवसभर कोर्टात खटला चालू. तक्रार माझ्या विरोधात. कुणी तक्रार केली मुलाने. माझ्यावर खटला दाखल करून एकप्रकारे मला कोर्टात खेचलं. यावेळी कोर्टाने निर्णय दिला की हा पक्ष अजित पवारांचा आहे शरद पवारांचा काही संबंध नाही. केंद्रात त्यांची सत्ता आहे. असंही शरद पवार म्हणाले.
माझ पहिल्यापासून धोरण आहे की फक्त शेती करायची नाही. माझ मत आहे दोन भाऊ असतील तर एकाने शेती करावी तर एकाने नौकरी करावी. त्यामुळे कायम आमची सत्ता ही कामगारांसाठी वापरली. मी सध्या ऐकतोय बारामतीत मलिदा गँग आहे. मला माहिती नाही मलिदा काय आहे पण लोक म्हणतात मलिदा मलिदा मलिदा. मात्र, आमच्या काळात आम्ही असली महिदा गँग कधी वाढू दिली नाही असा टोलाही शरद पवारांनी अजित पवारांना लगावला आहे.