मोठी बातमी! सुनेत्रा पवारांचा मार्ग सुकर? विजय वडेट्टीवार यांनी आतली गोष्ट सांगितली

बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेस अर्ज माघार घेण्यावर काँग्रेस नेत्याचं एकमत झाल्याचं आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय.

Untitle (46)

Untitle (46)

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीतून (Baramati By Election ) अर्ज माघारी घेण्याचा आजचा अखेर दिवस असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्लीत दाखल झाल्या आहेत. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले असून खुद्द सुनेत्रा पवार यांनीही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता, त्यामुळे जनभावना लक्षात घेत, निवडणुकीतून काँग्रेस माघार घ्यावी, याच भूमिकेवर एकमत झालं असल्याचे सुतोवाच काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

काकीसाठी पुतण्या मैदानात…काँग्रेस अर्ज माघे घेणार, सपकाळांच्या भेटीनंतर रोहित पवारांना विश्वास

बारामती निवडणुकीबाबत पुढे बोलतान वडेट्टीवार म्हणाले, या निर्णायापूर्वी दिल्लीच्या हायकमांडशी चर्चा करुन त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकावी लागेल आणि त्यांचा आदेश आल्यानंतर तो फॉर्म विड्रॉ करण्याची प्रक्रिया सुरु होईल. आमची भावना म्हणण्यापेक्षा विशेष करुन मला तर नाही पण प्रदेश अध्यक्षांना अनेकांचे फोन आलेत. सत्ताधारी पक्षातील म्हणा किंवा उपमुख्यमंत्री जे आता निवडणुक लढत आहेत सुनेत्रा पवार आणि त्यांचाही फोन होता. एकूण तिथली परिस्थती पाहता एकूण, सगळ्या लोकांची भावना लक्षात घेता, तिकडे निवडणुकीमधून पुढे जाणं हे थांबावं अशा प्रकारची भूमिका दिसली. आमच्या सर्वांचे एकमत झालेलं आहे”, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.

पोल्का-डॉट ट्रेंड पुनरागमन; शर्वरीपासून कार्डी बीपर्यंत हाय-फॅशन ट्विस्ट

तसेच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत संवाद साधत आहेत. रमेश चेन्निथला हर्षवर्धन सपकाळ आणि दिल्लीतील नेत्यांची चर्चा सुरू आहे. बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घेण्याच्या संदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही. माघारीची घोषणा विजय वडेट्टीवारांनी केली असली तरी, कॉग्रेसचा अधिकृत निर्णय झालेला नाही.

येत्या 24 तारखेला बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीकडून बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न सुरु आहेत. अशातच बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आलीयं. मोरे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा, असा सूर सत्ताधाऱ्यांकडून लावण्यात आला आहे. याबाबत काँग्रेसकडून अद्याप कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नसून महायुतीच्या कोणत्याही नेत्याने काँग्रेसच्या नेत्यांना संपर्क केला नसल्याचं स्पष्टीकरण महाराष्ट्र काँग्रेसकडून देण्यात आलं होतं.

बारामती पोटनिवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अशातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्लीत आहे. पार्थ पवार आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेणार असून या शपथविधीसाठी सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे बारामती पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसच्या गोठात मोठ्या हालचाली सुरु असल्याचं दिसून येत आहे.

Exit mobile version