काकीसाठी पुतण्या मैदानात…काँग्रेस अर्ज माघे घेणार, सपकाळांच्या भेटीनंतर रोहित पवारांना विश्वास
बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतलीयं.
Mla Rohit Pawar : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत (Baramati By Election) काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सर्वच पक्षांकडून बिनविरोध निवडणुकीसाठी हालचाली सुरु आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन बिनविरोध निवडणुकीसाठी गळ घातलीय. काँग्रेस बारामतीच्या पोटनिवडणुकीतून अर्ज माघे घेणार असल्याचा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलायं.
ना खाऊंगा, ना खाने दुंगाचा नारा पोकळ! 12 वर्षापासून मोदींच्या सहभागानेच देशाची लूट; सपकाळांचा घणाघात
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी काँग्रेस पक्षाने भरलेला फॉर्म मागे घेण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. बिनविरोध निवडणुकीबाबत मी सकारात्मक आहे. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी एफआयआर दाखल करून घ्यावा, ही काँग्रेस पक्षाचो भूमिका आहे, तशी सामान्य माणसांची आणि माझ्या सारख्या कार्यकर्त्यांची देखील आहे. अजितदादांबाबत जो काही तपास सुरु आहे, तो पारदर्शकपणे झाला पाहिजे, तो सामान्य माणसांचा अधिकार आहे. त्यात राजकारण होऊ नये, नाही तर वेगळ्या पद्धतीने दबाव येऊ नये, अशी काँग्रेसची भूमिका आहे. विनंती केल्यानंतर मी सकारात्मक असून अर्ज मागे घेण्याबाबत काँग्रेस विचार करेल. हर्षवर्धन सपकाळ वरिष्ठांशी बोलून योग्य निर्णय घेणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलंय.
‘द पॅराडाईज’मधील ‘आया शेर’ गाणं ठरलं हिट; 100 मिलियनहून अधिक व्ह्यूजसह धूम!
पार्थ पवारांच्या वक्तव्याची रोहित पवारांनी माफी मागितली…
पार्थ पवार यांनी काँग्रेस पक्षाबाबत ने जे विधान केलं होतं, ते फार चुकीचं होतं. त्याचं खंडन मी केलं सर्वांनीच केलं. एक भाऊ म्हणून अजितदादांचा कार्यकर्ता म्हणून काँग्रेसची दिलगिरी व्यक्त करतो केलेली सुद्धा आहे. विसरुन जाऊन काँग्रेसने ही निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न करावेत, असं रोहित पवार म्हणाले आहेत.