Download App

Barsu Refinery शरद पवार करणार मध्यस्थी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी केली फोनवरून चर्चा

  • Written By: Last Updated:

बारसू रिफायनरीचा मुद्दा सध्या राज्यभर गाजतो आहे. विरोधी पक्षाकडून यांच्यावर टीका केली जात असताना सत्ताधारी पक्षाकडून मात्र यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आज सकाळी उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता बारसू रिफायनरीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्याशी एकनाथ शिंदे यांनी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

स्थानिक लोकांच्या विरोधामुळे बारसूचा प्रश्न गंभीर झाला आहे. ज्या प्रक्रारे पोलीस आणि स्थानिक हे आमने-सामने आले, त्यामुळे सरकारवर टीका करण्यात आली. पण या प्रकरणात आता शरद पवार यांची एंट्री झाली आहे. उदय सामंत यांच्याशी भेट झाल्यानंतर बारसू रिफायनरी संदर्भात सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी पवार यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली आहे.

Sujay Vikhe : आमची कोंडी करणारा अजून जन्माला यायचाय; सुजय विखेंचा लंके-औटींना टोला

शरद पवार यांची मध्यस्थी

मागच्या आठवड्यापासून वादाचा मुद्दा ठरत असलेला बारसू मध्ये आता शरद पवार मध्यस्थी करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण शरद पवार आणि राष्ट्रवादी यांनी या प्रकल्पाला थेट विरोध न करता स्थानिकांचा विरोध का? हे समजून घेतलं पाहिजे. अशी भूमिका घेतली आहे. त्यात उदय सामंत आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर या प्रकरणात शरद पवार मध्यस्थी करताना दिसत आहेत.

पण आता या सगळ्यावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण यावर कालच शिंदे गटाकडून रिफायनरी संदर्भातलं उद्धव ठाकरे यांचं पत्र समोर आणलं आहे. तर ठाकरे गटातील काही नेते विरोध करत असले तरी काही नेते मात्र प्रकल्पाचं समर्थन करत आहेत. त्यामुळे ठाकरे नक्की काय भूमिका घेणार असा प्रश्न आहे.

Nana Patole : ‘मविआ राहिली नाही तर आमचा पालन तयार’

विरोध का आहे, हे समजून घेतलं पाहिजे

दरम्यान आज सकाळी याच मुद्द्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की राज्य सरकारकडून आंदोलकांची भूमिका समजून घेण्यासाठी सरकार आणि आंदोलक यांची बैठक घेतली पाहिजे. असं उद्योग मंत्र्यांना सांगितलं आहे. त्यावर ते उद्या राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि आंदोलक प्रतिनिधी यांच्यात चर्चा करून ती माहिती सरकारला देतील, असं ठरलं आहे.

स्थानिक लोकांशी मी अजून बोललो नाही, त्यामुळे इतकं सांगू शकत नाही. पण राज्यात एखादा मोठा प्रकल्प होत असेल तर स्थानिक लोकांचा विरोध का आहे, हे समजून घेतलं पाहिजे. याशिवाय आंदोलकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी जाणार का ? या प्रश्नांवर बोलताना शरद पवार म्हणाले की मी स्वतः त्या ठिकाणी जाणार नाही, पण माझ्या पक्षाचे लोक जाणार आहेत.

Parshuram Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…

Tags

follow us