Bajrang Sonawane on Pankaja Munde : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) रणधुमाळी सुरू आहे. राजकीय विरोधक एकमेकांवर टीकेच्या फैरी झाडत आहेत. आता महाविकास आघाडीचे बीडचे उमेदवार बजरंग सोनवणेंनी (Bajrang Sonawane) महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्यावर घणाघाती टीका केली. मला शेती वारसा हक्काने मिळालेली आहे. पण, त्यांना वारसा हक्काने २६ कारखाने मिळाले होते, असा टोला बजरंग सोनवणेंनी पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) लगावला.
माझ्यावर आरोप करतात, पण तेच खरे चोर…; बजरंग सोनवणेंची मुंडे बंधू-भगिनींवर टीका
महायुतीचे बीडचे उमेदवार बजरंग सोनवणे याच्या प्रचारार्थ आज बीडमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेला शरद पवार, जयंत पाटील, रणनीताई पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलतांना बजरंग सोनवणेंनी पंकजा मंडेंवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, बजरंग सोनावणे बुडावा नाही. माझ्या कारखान्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना एकच नंबर भाव दिले. माझ्याकडं मी कोणाचंही बील थकलं नाही. मात्र, वैद्यनाथ सारख कारखान्याने ऊसाचे बील दिले नाही, असं प्रत्येक गावातील शेतकरी सांगत आहे. मुकादमांचे पैसे दिले नाहीत. कामगारांचे पैसे दिले नाहीत. आणि ते माझ्यावरच चोर असल्याचा आरोप करतात. पण तेच खरे चोर आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे लुटले, अशी टीका सोनवणेंनी केली.
Mumbai Airport : मोठी बातमी, मुंबई विमानतळावर 15 कोटींचे अंमली पदार्थ जप्त
धनंजय मुंडे सांगतात 2019 ला सोनवणेंना माझ्यामुळं उमेदवारी मिळाली होती. माझ्यामुळं उमेदवारी दिल्याचं ते सांगतात आणि माझ्या शेतीत काय पिकतं हे एकदा पाहावंच लागेल, असं म्हणतात. मुंडे साहेब, पंधरा वर्ष आपण एकत्र संसार केला. तेव्हा माझ्या शेतीत काय पिकतं, हे कसं दिसलं नाही, असा सवाल सोनवणेंनी केला.
पुढं बोलतांना ते म्हणाले, मला शेती वारसाहक्काने मिळालेली आहे. आजही आपले वडील शेती करतात. मीही आधी शेतकरी आहे, नंतर उद्योजक आहे. पण, त्यांना वारसाहक्काने २६ कारखाने मिळाले आणि त्यांनी शुन्य केले, असा टोला सोनवणेंनी पंकजा मुंडेंना लगावला.
खासदार झाल्यानंतर पंकजा मुंडे बीड जिल्ह्याचा विकास करतील, मोदी साहेबांच्या खांद्याला खादा लावून काम करतील. विकासाची गंगा जिल्ह्यात आणतील, असं महायुतीचे नेते सांगत आहेत. पण, गेल्या कित्येक दिवस बीड मतदारसंघात तुमचा खासदार आहे, पालकमंत्रीपदही तुमच्याच घरात आहे, केंद्रातही आणि राज्यातही तुमचंचं सरकार आहे. मग का विकास झाला नाही? मागच्या दहा वर्षात तुम्ही काय केलं? कार्यसम्राट खासदार प्रीतम मुंडे फंडाचा निधीही खर्च करू शकले नाहीत, असा टोला सोनवणेंनी लगावला.