Download App

भाजप आणि शिंदे गटात मिठाचा खडा! सापत्न वागणूक मिळत असल्याचा कीर्तिकरांचा आरोप

शिंदे गट आणि भाजपने (BJP) राज्यात सत्ता स्थापन केली आहे. आमच्यात एकोपा असल्याचे दोन्ही गटांकडून वारंवार बोलले जात आहे. मात्र, भाजप आणि शिंदे गटात सर्व काही आलबेल दिसत असले तरी दोन्ही पक्षांत अंतर्गत धुसफुस असल्याचं आता समोर आलं. शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर (MP Gajanan Kirtikar) यांनी माध्यमांशी संवाद साधतांना भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. (Conflict Between Eknath Shinde Camp and BJP, MP Gajanan Kirtikar alligations on BJP)

लोकसभा निवडणुकीला जवळपास 11 महिने शिल्लक आहेत. अशात शिवसेना आणि भाजपमध्ये आतापासूनच वादावादी सुरू झाली आहे. कीर्तिकर यांनी माध्यमांना बोलतांना सांगितले की, आम्ही एनडीएचे घटक आहोत. यापूर्वी आम्ही एनडीएचा भाग नव्हतो. मात्र, आता आम्ही एनडीएचे घटक आहोत. भाजपने घटक पक्षांना महत्त्व दिले पाहिजे. पण घटकपक्षांना फारसं महत्व दिलं जात नाही. भाजपकडून सापत्न वागणूक दिली जात आहे, असा गंभीर आरोप कीर्तिकर यांनी केला आहे.

नेहरुंची अॅलर्जी असल्यानेच हैदराबादमधील बँकींग संस्थेचे नामकरण; अतुल लोढेंची BJP-RSS वर टीका

यावेळी बोलतांना त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबतही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी शिंदे गट 22 जागांवर लढण्याचा केवळ दावा करणार नाही, तर त्यासाठी आम्ही तयारीही केली आहे. कीर्तिकर यांच्या या वक्तव्याने आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजप युती बिघाडी निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, कीर्तिकर यांनी केलेल्या या वक्तव्याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी बोलतांना सांगितले की, गजानन कीर्तिकर यांनी असे कुठेही म्हटलेले नाही. या सगळ्या कल्पोकल्पित गोष्टी आहेत. आमच्यात (भाजप-शिवसेना) कोणतीही अडचण नाही. शिवसेना आणि भाजप दोघेही अतिशय समन्वयाने काम करत आहेत. सगळ्या गोष्टी ठरतील तेव्हा आम्ही आपल्याला सांगू, असं म्हणत फडणवीस यांनी भाजप आणि शिंदे गटातील सुरू झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, महाविकास आघाडीत जागा वाटपावरून जे काही कुरबुरी वाढल्या आहेत, त्याचप्रमाणे आता शिंदे गटातही जागावाटपावरून आणि निधीवरून ठिणगी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता कीर्तिकर यांच्या वक्तव्यावर भाजप नेमकी काय भूमिका घेते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us