Download App

पडद्यामागच्या रश्मी ठाकरे आता प्रत्यक्ष राजकारणात; नाशिक दौऱ्यातून सक्रिय राजकारणाची सुरुवात?

  • Written By: Last Updated:

गेल्या काही वर्षात पहिल्यांदा ठाकरे कुटुंबीय मोठ्या चक्रव्यूहातून आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर ठाकरे कुटुंबाला त्यांनी राजकीय संकटात आणले. त्यानंतर ठाकरे कुटुंबाची पुढची रणनीती काय असणार असा प्रश्न विचारला जातो आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे राज्यभरात दौरे चालू आहेत. त्यात आता रश्मी ठाकरे देखील राजकीय दौरे करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

याआधीही रश्मी ठाकरे या नेहमी उद्धव ठाकरे यांच्यासोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांना नेहमी हजर राहिलेल्या पहिल्या आहेत. पण पक्षाच्या नव्या बांधणीसाठी स्वतः रश्मी ठाकरे देखील लक्ष घेणार घालणार आहेत. नाशिकमध्ये महिला मेळाव्यातून रश्मी ठाकरे या शक्तीप्रदर्शन करणार आहे. त्यामुळे विस्कटलेल्या संघटनात्मक बांधणीसाठी रश्मी ठाकरे मैदानात उतरल्याचे सांगितले जात आहे.

कुणाल कामरा यांनी मोदी सरकारच्या नव्या आयटी कायद्याला कोर्टात दिलं आव्हान; कोर्टाने सरकारला सुनावलं

उद्धव ठाकरे देखील राज्याच्या दौऱ्यावर

राज्यभरात महाविकास आघाडीच्या सभा होतायेत, शिवसेनेच्या स्वतंत्रपणे देखील होताय. त्यामुळे राज्यभरात उद्धव ठाकरे प्रमुख ठिकाणी जातील, पक्ष बांधणीसाठीही ते गरज असतील त्या ठिकाणी जातील. अशी माहिती ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

येत्या २३ एप्रिलला उद्धव ठाकरे जळगाव मधील पाचोरा या ठिकाणी सभा घेणार आहेत. असं संजय राऊत यांनी सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की नाना पटोले यांनी जी भूमिका घेतली आहे, ती माहित नाही. पण काल जी शरद पवार यांच्यासोबत भेट झाली. त्यामध्ये राज्यभरात महविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढण्यावर चर्चा झाली आहे, तोच विचार आम्ही पुढे नेणार आहोत.

कुणाल कामरा यांनी मोदी सरकारच्या नव्या आयटी कायद्याला कोर्टात दिलं आव्हान; कोर्टाने सरकारला सुनावलं

Tags

follow us