Download App

‘पालकमंत्रीपदा’वरून तटकरे-गोगावलेंमध्ये राजकीय संघर्ष पेटला, मंत्रीपदावर गोगावलेंचा दावा

  • Written By: Last Updated:

रायगड जिल्ह्यात आजवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व होते. सुनील तटकरे यांचा रायगड हा बालेकिल्ला होता. मात्र, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे शिंदे गटाकडे गेलं. शिंदे गटाचे उदय सामंत हे रायगडचे पालकमंत्री आहेत. आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आमदार अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनीही महायुतीत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळं आता तटकरेंकडे रायगडचे पालकमंत्रीपद  देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी पालकमंत्रीपदावर आपला दावा ठोकला. मंत्रिमंडळ विस्तारात मला संधी मिळेल आणि रायगडचं पालकमंत्रीपदही मलाच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Bharat Gogawale on aditi takkare I will be the Guardian Minister of Raigad)

https://www.youtube.com/watch?v=I2f9gQrbQD0

आज माध्यमांशी बोलतांना भरत गोगावले यांनी सांगिलते की, लवकरच रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा विस्तार होईल. आणि या मंत्रिमंडळात मला संधी मिळेल. पावसाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होण अपेक्षित आहे. भाजपसोबत गेल्यानंतर शिंदे गटातील ज्या आमदारांना मंत्रिपदे देण्यात येणार होती, त्या पहिल्या ९ जणांमध्ये माझा नंबर होता. मात्र, मी थांबलो. मला मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळं होणाऱ्या मंत्रिमंडळात मला संधी मिळेल, ते म्हणाले.

Mazgaon Dock मध्ये  बंपर भरती, आठवी-दहावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज,  अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 

अदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळं आता रायगडचे पालकमंत्री पद कोणाला मिळेल? असा प्रश्न विचारताच गोगावले यांनी सांगिलते की, रायगडचा पालकमंत्री मीच असेल. दुसंर कोण असणार? अदिती तटकरेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी त्यांना पालकमंत्री करायचं असेल तर अन्य कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद द्यावं. रायगडचे कारण, त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पालकमंत्री पद शिवसेनेला देण्याचं ठरलं होतं. त्यामुळं सुरूवातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर उदय सामंत यांना जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलं. त्यामुळं आताही रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे जाण्याचा प्रश्नच नाही. भरत सेठचं रायगडचे पालकमंत्री होतील, असं गोगावले यांनी स्पष्ट केलं. त्यामुळं तटकरे विरुध्द गोगावले हा संघर्ष पेटायला सुरूवात झाली.

दरम्यान, भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रीपदावर ठाम असल्यानं रायगडचे पालकमंत्रीपद कोणाला मिळेल, हेच पाहणं औत्सुक्याचं आहे.

Tags

follow us