Download App

‘थोड्या दिवसांसाठी यात का अडकून पडायच!’, गोगावलेंनी ST महामंडळाचं अध्यक्षपद नाकारलं?

  • Written By: Last Updated:

Bharat Gogawale : शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांची एसटी महामंडळाच्या (ST Corporation) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र गोगावले यांनी अद्याप हे पद स्वीकारलेले नाही. त्यामुळं गोगावलेंनी मंत्रीपदासाठी जो कोट शिवला होता, तो कोट तसाच पडून राहण्याची चिन्हं आहेत.

प्लास्टिकच्या पिशवीत लघवी करुन त्याच हाताने फळ विक्री; विक्रेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात 

भरत गोगवाले हे दीर्घ काळापासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत होते. त्यांची एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदी वर्णी लागेल आणि रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळेल, अशी चर्चा होती. त्यांनी उघडपणे आपली इच्छा बोलूनही दाखवली होती. मात्र, विधानसभेचा कार्यकाळ संपत आला तरीही गोगावलेंनी त्रीपद मिळालं नव्हतं. अखेर राज्य सरकारने त्यांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली. तसा शासन निर्णय जारी देखील सरकारकडून जारी करण्यात आला आहे.

तिरुपती लाडू वाद : चंद्राबाबू नायडूंची मोठी घोषणा, सर्व मंदिरे ‘स्वच्छ’ होणार 

दरम्यान, एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर गोगावलेंनी अद्यापही पदभार स्वीकारलेले नाही. ते पदभार स्वीकारत नसल्याने वेगळीच चर्चा सुरू झाल्या. आता गोगावले यांनी पद न स्वीकारण्यामागचे खरे कारण उघड केलं. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना थोड्या दिवसांसाठी यात का अडकून पडायचं, अशी भूमिका गोगावलेंनी घेतली.

एका वृत्त वाहिनीशी बोलतांना ते म्हणाले की, महामंडळ हवे ही आमची मागणी नव्हती. पण मुख्यमंत्र्यांनी मनधरणी केली, तसा जीआर काढला, ऑर्डरी निघाली. मी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो. हे पद दिले त्याला खूप उशिरा झाला. निवडणुका जवळ आल्यात. आचारसंहितेला 15 ते 20 दिवस शिल्लक आहेत. आम्ही पक्ष वाढीसाठी काम करत आहोत. मग काही दिवस ह्यात का अडकून राहायचे असा प्रश्न पडतो. याबाबत कार्यकर्ते – पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ, असं गोगावलेंनी म्हटलं. यामुळे गोगावले अध्यक्षपद नाकारतील, अशी चर्चांना सुरूवात झाली आहे.

 

 

 

follow us