प्लास्टिकच्या पिशवीत लघवी करुन त्याच हाताने फळ विक्री; विक्रेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात
Dombivli News : काही वर्षांपूर्वी एका पाणीपुरी विक्रेत्याने पाणीपुरीच्या पाण्यात आपली लघवी मिसळल्याची घटना घडली होती. आताही असाच काहीस प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला. डोंबिवलीतील निळजे परिसरातील एका फळ विक्रेत्याने (fruit seller) प्लास्टिकच्या पिशवीत लघवी केली, त्यानंतर त्याच हाताने फळ विक्री केल्याचं किळसवाणा प्रकार केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, या व्हायरल व्हिडिओची पोलिसांनी (Manmada Police) दखल घेतली.
तिरुपती लाडू वाद : चंद्राबाबू नायडूंची मोठी घोषणा, सर्व मंदिरे ‘स्वच्छ’ होणार
सविस्तर वृत्त असे की, डोंबिवलीतील निळजे परिसरात एका फळ विक्रेत्याने प्लास्टिकच्या पिशवीत लघवी करून त्याच हाताने ग्राहकांना फळे दिली. सदरील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या फळ विक्रेत्याचे हे कृत्य उघडकीस आल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. दरम्यान, मानमाडा पोलिसांनी सदरील व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. अली खान असं या फळ विक्रेत्याचं नाव आहे.
भारताने रचला इतिहास, Chess Olympiad 2024 मध्ये जिंकले सुवर्णपदक
पोलिसांनी अली खानची कसून चौकशी केली. दरम्यान, या किळसवाण्या प्रकारासाठी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकाराबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी संबंधित व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करू असे सांगितलं. चोपडे म्हणाले की, सदर व्हिडिओची खातरमजाम पोलिसांनी केली आहे. फळ विक्रेत्याला अटकही केली आहे. त्याची चौकशी केली आहे. त्याच्या या घृणास्पद कृत्याबद्दल कायदेशीर तरतुदीप्रमाणे गुन्हा दाखल करू.
दरम्यान, नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याच्या अशा घटना सातत्याने घडत आहे. मुंबईसह राज्यातील इतर शहरांमध्येही बेकायदेशीर नाश्ता सेंटर, फळ विक्रीचे स्टॉल वाढताना दिसत आहे. तसेच त्या ठिकाणी स्वच्छतेचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याने आरोग्यही धोक्यात आले आहे.