Download App

‘विधानसभा अध्यक्ष दुतोंडी, ते पक्षपातीपणा करतात’; भास्कर जाधव संतापले, DCM शिंदेंचाही घेतला समाचार

विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणा करत आहेत. हे अध्यक्ष सरकार म्हणून वावरतात. स्वत: सरकारला वाचवण्यासाठी ते प्रयत्न करून धन्यता मिळवत आहेत.

  • Written By: Last Updated:

Bhaskar Jadhav : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर जोरदार टीका केली. विधानसभा अध्यक्ष दुतोंडी आहेत, त्यांनी सरकार बरखास्त करून स्वत: उत्तरे द्यावीत, असा टोला जाधवांनी लगावला. तर मुंबईतील विकासकामांवर त्यांनी शिंदेंवरही हल्लाबोल केला.

चेन्नास्वामी स्टेडियम चेंगराचेंगरी प्रकरण, विराट कोहली जबाबदार, उच्च न्यायालयात अहवाल सादर 

विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणा करतात…
17 जुलै 2025 रोजी विधानसभेत जाधव यांनी शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या उत्तरावर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अध्यक्ष नार्वेकर यांनी नियमांचा हवाला देत त्यांना परवानगी नाकारली. त्यामुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला. प्रश्न विचारू न दिल्याने जाधवांनी सभात्याग केला. त्यानंतर संतापलेल्या जाधव यांनी माध्यमांशी बोलताना विधानसभा अध्यक्षांवर पक्षपातीपणाचा आरोप केला. ते म्हणाले, विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणा करत आहेत. हे अध्यक्ष सरकार म्हणून वावरतात. स्वत: सरकारला वाचवण्यासाठी ते प्रयत्न करून धन्यता मिळवत आहेत. अध्यक्षांनी सरकार बरखास्त करून स्वतः सरकार चालवावे, असा टोला त्यांनी लगावला.

‘मी एका माणसाला भेटले… ज्याचं नाव होतं मोहित सूरी’; ‘सैयारा’च्या प्रदर्शनाआधी अनीत पड्डांची भावनिक पोस्ट 

तसेच माझ्यावर हक्कभंग आणला तरी हकरत नाही. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळाची परंपरा धुळीस मिळवली, अध्यक्षांना अदानाींना वाचवायचं आहे, ते दुतोंडी आहेत, अशी टीकाही जाधव यांनी केली.

शिंदे यांच्यावर टीका करताना जाधव म्हणाले, उपमुख्यमंत्री उत्तर देत आहेत. मात्र, इतर मुद्द्यांवर भाष्य केलंच नाही. फक्त मुंबईवरच चर्चा केली. महाराष्ट्राच्यचा बाहेर परभणी, ठाणे, शिक्षण, बांधकाम, पाणी योजनांच्या विषयावर ते बोलले नाही, असं जाधव म्हणाले.

मुंबईत होणाऱ्या विकासकामांवरूनही जाधवांनी शिंदेंवर निशाणा साधला. ते म्हणाले,
अटल सेतू आमच्या सरकारने बांधला. वरळी सिंक रोड आम्ही बांधला. उठसूठ ठाकरेंवर टीका करायला लाज वाटत नाही का? तसेच शिंदे 2014 पासून नगर विकास खात्याचे मंत्री आहेत. ते मेहेरबनानी करत नाही, असं जाधव म्हणाले.

पुढं बोलताना ते म्हणाले, उपमुख्यमंत्री खिचडी घोटाळ्याबद्दल बोलतात. मात्र मुळात त्यांचाच कंत्राटदार संजय माशेलकर हा याचा मास्टरमाईंड आहे आणि त्याला अजूनही अटक केली गेली नाही, तो शिंदेंच्याच पक्षात आहे, असंही जाधव म्हणले.

 

follow us