‘मी एका माणसाला भेटले… ज्याचं नाव होतं मोहित सूरी’; ‘सैयारा’च्या प्रदर्शनाआधी अनीत पड्डांची भावनिक पोस्ट

‘मी एका माणसाला भेटले… ज्याचं नाव होतं मोहित सूरी’; ‘सैयारा’च्या प्रदर्शनाआधी अनीत पड्डांची भावनिक पोस्ट

Aneet Padda Emotional Post On Mohit Suri : यशराज फिल्म्सची बहुप्रतिक्षित रोमँटिक फिल्म ‘सैयारा’ (Saiyaara Movie) या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात अनीत पड्डा (Aneet Padda) मुख्य भूमिकेत असून तिच्या सोबत नवोदित अभिनेता अहान पांडे दिसणार आहे. मोहित सूरी (Mohit Suri) दिग्दर्शित आणि वायआरएफ चे सीईओ अक्षय विधानी निर्मित, ‘सैयारा’ अनीत आणि अहान या दोघांची यशराज सोबतचा पहिलाच चित्रपट आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येला, अनीतने मोहित सूरीसोबतचा एक फोटो शेअर करत एक सुंदर आणि भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने चित्रपटाशी संबंधित सर्वांच्या प्रती आभार मानले (Entertainment News) आहेत. मी एका माणसाला भेटले ज्याचं नाव होतं मोहित सूरी. तो प्रेमाकडे फारच वेगळ्या नजरेने पाहतो, आणि वेदना त्याने इतक्या प्रामाणिकपणे समजून घेतल्या आहेत, की त्या त्याच्या कथेत उमटतात. त्याने त्या दुःखाला अर्थ दिला. त्याच्याकडे पाहिलं, त्याला जवळ घेतलं आणि जाणून घेतलं की (Bollywood) ते कुठे नेतं.

राज्य उत्पादन शुल्क विभागातील पुढील भरती जवानांमधून होणार; अजित पवारांची माहिती

ती पुढे म्हणाली फक्त प्रतिमा आणि संगीत पुरेसं नव्हतं. त्याला दोन्ही जिवंत हवंच होतं. मग त्याने बोलावलं छायाचित्रकार विकास शिवरामनला, ज्यानं ती प्रतिमा टिपली. एका स्त्रीची, जी हरवलेली जादू आणि प्रकाश शोधत होती. सुमना घोष, एक विश्वास ठेवणारा माणूस (संकल्प सदाना) आणि स्वप्नांची संधी देणारा मार्गदर्शक आदित्य चोपड़ा कायम होता. त्यांनी एक टीम बनवली (संपूर्ण कास्ट व क्रू), रात्री जागत नवीन काहीतरी घडवलं. संकटं होती, पण त्यांनी झुंज दिली. कारण त्यांच्याकडे एक कथा होती, ज्याला श्वास द्यायचा होता. अपयश आलं तरी हरकत नाही, कारण आत्म्याने तयार केलेल्या गोष्टी नाकारता येत नाहीत.

“दिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल”, एकनाथ शिंदेंच्या इशारा कुणाला

कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांच्याविषयी अनीत म्हणाली की, मग आली एक शोध घेणारी स्त्री शानू शर्मा , थोडं जादू, थोडी आशा. तिने शोधले दोन भटकंती करणारे जीव, नवखे, घाबरलेले, पण मनाने प्रामाणिक. तिने मोहितला सांगितलं, हेच आहेत ते योग्य चेहरे. यांना आकार दे, शिकव, ते सज्ज आहेत. त्यांना अजून खूप काही माहित नाही, पण त्यांच्या हृदयात खरी भावना आहे. मोहितने आपल्या लाल खुर्चीत बसून आपल्या प्रसिद्ध नजरेने निवड केली.

अनीतने शेवटी लिहिलंय की, मी हे जवळून पाहिलं याचं मला भाग्य वाटतं. आहान आणि मी दोघंही खूप नशिबवान आहोत. आम्हाला या माणसाने स्वीकारलं, आमच्या अनेक ‘का’ आणि ‘कधी’ प्रश्नांची उत्तरं दिली. मोहित सूरी, तुम्ही एक सुंदर व्यक्ती आहात, प्रत्येक गाण्यात छाप उमटवणारे. या दृढ दृष्टीकोनासाठी, संगीतासाठी, आणि आपलं हृदय जगासमोर मांडल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aneet Padda (@aneetpadda_)

follow us
  • fb
  • instagram
  • youtube