“दिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल”, एकनाथ शिंदेंच्या इशारा कुणाला

Eknath Shinde : विधानसभेत आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधी (Eknath Shinde) पक्षांवर चांगलेच संतापल्याचे दिसून आले. मिठी नदीतला गाळ काढण्याचं कंत्राट देताना तुम्हाला मराठी माणूस दिसला नाही का असा सवाल करत आता त्या डिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल, असा इशारा त्यांनी कुणाचंही नाव न घेता दिला. मुंबईतील विविध कामांतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांवर आगपाखड केली.
शिंदे म्हणाले, एक कपड्याचा व्यापारी तुम्ही त्याला कोविड सेंटर बनवायला दिलं आता कुणावर आरोप करता भ्रष्टाचाराचे? आता म्हणताहेत काँक्रिटच्या रस्त्यांचं ऑडीट करा. जरुर ऑडीट करायलाच पाहिजे. काँक्रिटचे रस्ते एकदा सुरू झाल्यानंतर त्यात 25 वर्षे दुरुस्ती करता येत नाही. मग दरवर्षी दुरुस्ती करून काळ्याचं पांढरं करुन दुरुस्तीच्या नावाखाली पैसे काढण्याचं काम कोण करत होतं? आम्ही तर रस्ते धुवायचं काम केलं पण तुम्ही तर तिजोऱ्याच धुतल्या. आम्हाला सुद्धा बोलता येतं.
मोठी बातमी! अभिनेता डिनो मोरीयाच्या घरी ईडीची छापेमारी
मिठी नदीतला गाळ कोण काढतोय? कोण आहे काँट्रॅक्टर? त्यांना डिनो मोरिया दिसला. मराठी माणूस नाही दिसला. आता त्या मोरियाने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोरया होईल. आरोप करताना असे आरोप करा की “शिशे के घर में रहते है वो दुसरे के घरपर पत्थर फेंका नहीं करते.” अशा हिंदी शायरी करत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
शिंदे पुढे म्हणाले, आम्ही लोक प्रामाणिकपणे काम करत आहोत. काँक्रिटचे रस्ते कधी पाहायला मिळाले असते का? बीएमसीने कोस्टल रोड सुरू केला. पण हा रोड फास्ट कुणी केला. अटल सेतूद्वारे तर पंधरा ते वीस मिनिटांत पोहोचता येतं या गोष्टी लक्षात घ्या.
जेव्हा तु्म्ही भ्रष्टाचाराचा आरोप करता त्यावेळी आरोप करताना आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. अॅक्टर कोण डिनो मोरिया, काँट्रॅक्टर कोण तेही शोधून काढा. टेंडर टेंडर करुन मुंबईला विकणारा व्हेंडर कोण ते पण सांगा. यादी काढा. मराठी माणसासाठी आम्ही काय केलं हे मी आधीच सांगितले आहे.
आमदाराचा मार, मंत्र्याची नोटांची बॅग; एकनाथ शिंदेंचा संताप, दोन्ही संजयला सुनावले खडेबोल