Download App

Bhaskar Jadhav यांची बावनकुळेंच्या वर्णावरून शेलक्या भाषेत टीका; म्हणाले…

  • Written By: Last Updated:

Bhaskar Jadhav on Bavankule : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर खालच्या पातळीची टीका केल्याचं पाहयला मिळालं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून टीका करण्याची आणि भाषेची पातळी दिवसेंदिवस खालावत चालल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान जाधव यांच्या टीकेनंतर भाजप देखील आक्रमक झालं आहे.

फडणवीस बेईमानी करणार नाही; जरांगेंना भिडेंचे बळ; आंदोलन यशस्वी करण्यासाठी दिला कानमंत्र

भास्कर जाधव यांच्याकडून खालच्या पातळीची टीका…

काल सोमवारी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट त्यांच्या वर्णावरून शेलक्या भाषेत टीका केली. जाधव म्हणाले की, ‘भाजप उद्धव ठाकरेंना जर घर कोंबडा म्हणत असेल तर ती उद्धव ठाकरेंवर व्यक्तीगत टीका नाही का? मग बावनकुळे या वेस्ट इंडिजच्या माणसाला ठाकरे घराण्याची महती काय कळणार?’

KL Rahul: ‘जावयाला कुठे ठेवू आणि कुठे नको’; सुनिल अन् अथिया शेट्टीने केलं दणक्यात सेलिब्रेशन

‘तसेच बावनकुळे हे उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या पोटी जन्मले म्हणजे कलंक आहे. असं म्हणतात. मग त्यांना वेस्ट इंडिजचे म्हटलं तर लागत का? बावनकुळेंना, फडणवीसांना बोलायचं नाही. मग आमच्या पक्ष प्रमुखांना तुम्ही काहीही बोलाल का?’ असं म्हणत जाधव यांनी बावनकुळे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

राम सातपुतेंचं प्रत्युत्तर…

दरम्यान भास्कर जाधव यांनी बावनकुळे यांच्यावर खालच्या पातळीची टीका केल्यानंतर भाजप देखील आक्रमक झालं आहे. त्यावर भाजप आमदार राम सातपुते यांनी जाधव यांनाा बावनकुळेंच्या टीकेवर खडसावून प्रत्युत्तर दिले आहे. राम सातपुते म्हणाले की, ‘बावनकुळेंवरील टीकेतून उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांचा ओबीसी द्वेष दिसत आहे.’

‘एका सामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्याला राज्याचं अध्यक्षपद भेटलं आहे. हे त्यांना सहन होत नाही. ओबीसी हे कधीही विसरणार नाही. एका चांगल्या नेतृत्वावर त्याच्या रंगावरून टीका करण्याचा केविलवाणा प्रयत्न उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष करत आहे. याचं उत्तर त्यांना द्याव लागेल.’ असं यावर राम सातपुते म्हणाले.

Tags

follow us