मुंबई : कालची जी सभा झाली ती ‘ढ’ विद्यार्थ्यांची सभा झाली. उद्धव साहेबांची (Uddhav Thackeray) सभा ही ५ मार्चला त्याच मैदानावर झाली आणि म्हणून त्यांच्यासमोर आमच्या सभेचा विक्रम आणि आमच्या सभेचा उच्चांक हा त्यांच्या डोळ्यासमोर होता. त्यामुळे त्यांनी जवळजवळ अर्ध्या महाराष्ट्रातून माणसं नेली. (Maharashtra Politics) परंतु तरीदेखील ते आमच्या सभेच्या जवळपास येऊ शकले नाहीत. असा टोला यावेळी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी लगावला.
फार अशी शिवराळ भाषा सभेमध्ये चालत नाही, फार असं कोणाबद्दल टीका टिप्पणी करून खालच्या स्तरावर बोललेलं आवडत नाही आणि काल आपण बघितला असेल की रामदास कदम यांचं भाषण सुरू झालं आणि सभेतून जी माणसे उठायला सुरुवात झाली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं भाषण सुरू झालं संपत आलं ती माणसं उठून निघतच होती थांबायला तयार नाहीत.
पुढे ते म्हणाले, रामदास कदम (Ramdas Kadam ) तात्या विंचू म्हणायचो. तात्या विंचू कसा आहे, कारण गेल्या ८ महिने ज्या मुलाखती रामदास कदम देत आहेत, जे बोलतायेत त्याच्या व्यतिरिक्त रामदास कदमांकडून एकही नवा मुद्दा नाही. मला कसं संपवलं माझ्या मुलाला कसं संपवलं मी विरोधी पक्षनेता मुख्यमंत्री झालो असतो म्हणून मला उद्धव साहेबांनी (Uddhav Thackeray) संपवलं, वगरे… त्यामुळे रामदास कदम यांना आता नवीन उपमा देण्याची गरज आहे. रामदास कदम म्हणजे आमच्या कोकणातला जोकर आहे.