Download App

राहुल कुल यांचा पाय आणखी खोलात; राऊत देणार भीमा सहकारी कारखान्याला भेट

दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यात भाजपचे आमदार राहुल कुल यांनी पाचशे कोटीचे मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊतांंनी हे आरोप करून चौकशीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमिवर भीमा पाटस सहकार बचाव समितीने संजय राऊत यांनी मुंबई येथे भेट घेऊन आभार मानले आहेत.

तसेच खासदार राऊत यांना भीमा पाटस कारखान्याला भेटीचे निमंञण दिल्याची माहिती भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी दिली आहे. पाटस ( ता. दौंड ) भीमा सहकारी साखर कारखाना थकीत कर्जामुळे ५० हजार सभासदांच्या मालकीचा कारखाना राज्य सहकारी बँकेने २५ वर्ष भाडेकरावर चालवायला देण्याची निविदा काढल्यापासून सहकार बचाव समितीने कारखान्याच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यासंदर्भात समितीच्यावतीने संबंधित विभागांकडे तक्रार व कायदेशीर मार्गाने न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

हिंदू मुस्लिमामध्ये दंगल घडवण्याचा भारतीय जनता पार्टी व एमआयएमचा कट; अंबादास दानवेंचा आरोप

माञ राजकीय वरहस्तामुळे कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. परंतु नुकतीच खासदार संजय राऊत यांनी पञकार परिषद घेऊन भीमा पाटस कारखान्याचे अनेक वर्ष अध्यक्षपद भूषविलेले व सध्या भाजपचे आमदार असलेले राहुल कुल यांच्यावर कारखान्यात पाचशे कोटीचे मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप करून खळबळ उडून दिली. या आरोपांमुळे आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी राऊतांचा निषेध केला होता.

Maharashtra Politics : ‘उद्धव ठाकरे लवकरच महाविकास आघाडीतून बाहेर पडतील; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

माञ राऊतांनी केलेल्या आरोपांमुळे सहकार बचाव समितीच्या लढयाला राज्य व देश पातळीवर मांडण्याचे काम केले आहे. त्यामुळे सहकार बचाव समितीच्यावतीने खासदार राऊतांची मुंबई येथे भेट देऊन आभार मानले. तसेच समितीच्या मागणीचे निवेदन राऊत यांना देऊन कारखान्याच्या सभासदांना न्याय मिळून देण्याचे आवाहन केले आहे. कारखान्याच्या कायदेशिर लढयाचे माहिती राऊत यांना देऊन भीमा पाटस कारखान्याला भेट देण्याचे निमंञण दिले. यावेळी राऊत यांनी संसदेचे अधिवेश संपल्यानंतर कारखान्याला भेट देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती ताकवणे यांनी दिली.

Tags

follow us