Bhosri & Chinchwad Assembly Constitution : भोसरी आणि चिंचवड विधानसभा (Bhosri & Chichwad Constitution) मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवारीचा सस्पेन्स संपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) यांच्या पक्षाला भोसरी आणि चिंचवड या दोन्ही जागा सुटल्या असून भोसरीतून अजित गव्हाणे तर चिंचवडमधून राहुल कलाटे यांच्या नावाची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
पानचिंचोली येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश, संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले स्वागत
गेल्या काही दिवसांपासून भोसरी किंवा चिंचवड या दोन पैकी एक जागा ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटेल अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र शरद पवार यांनी अजित पवारांच्या बालेकिल्लातील भोसरी आणि चिंचवड ह्या दोन्ही जागा आपल्याकडे खेचत या दोन्ही मतदारसंघात रंगत आणली आहे. भोसरी आणि चिंचवड मधून अनुक्रमे महेश लांडगे आणि भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांची महायुतीकडून उमेदवार म्हणून आधीच घोषणा करण्यात आली आहे. मात्र या दोन्ही जागी महाविकास आघाडी कडून उमेदवारीचा घोळ सुरूच होता मात्र आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला या दोन जागा सुटल्या असून त्यांनी दोनही जागी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.
भोसरीमध्ये अजित गव्हाणे यांना उमेदवारी दिली जाईल हे अपेक्षित होतं. मात्र, चिंचवडमध्ये धक्कादायक म्हणजे गेल्या पोट निवडणुकीमध्ये बंडखोरी केलेले राहुल कलाटे यांना शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काही झालं तरी भाजपचे काम करणार नाही आणि निवडणूक लढवणारच अशी भूमिका घेतलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अन गत पोट निवडणूक लढवलेले नाना काटे हे ऐनवेळी जागा कुणाला सुटते हे पाहून ठाकरेंच्या शिवसेनेत किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील असा अंदाज अनेकांनी बांधला होता. मात्र तसं न घडता राहुल कलाटे यांनी बाजी मारली असून त्यांची उमेदवारी राष्ट्रवादी कडून घोषित करण्यात आली आहे.
गत पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेत असलेले राहुल कलाटे यांनी पक्षादेश डावलत बंडखोरी केली होती. त्या निवडणुकीमध्ये कलाटे यांना सुमारे 40 हजार मते पडली होती आणि सुमारे 36 हजार मताच्या फरकाने नाना काटे यांचा पराभव झाला होता. आता अधिकृत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राहुल कलाटे हे उमेदवार असणार आहे. आता नाना काटे पोटनिवडणुकीत कलाटे यांनी घेतलेल्या भूमिकेची परतफेड करणार की महायुतीचा युतीधर्म पाळणारा याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे? कलाटे यांच्यासमोर तूर्तास तरी पहिलीच विधानसभा निवडणूक लढवत असलेले भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच आव्हान असणार आहे.
मोठी बातमी! नगरमध्ये माजी महापौर अभिषेक कळमकर देणार संग्राम जगतापांना फाईट, उमेदवारी जाहीर
राहुल कलाटे यांनी शंकर जगताप यांचे मोठे बंधू भाजपचे दिवंगत येते लक्ष्मण जगताप तसेच अश्विनी जगताप यांच्या विरोधात याआधी विधानसभा निवडणूक लढवलेली आहे. त्यामुळे शंकर जगताप यांना राहुल कलाटे कस आव्हान देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे भोसरीमधून हॅट्रिक करण्यासाठी सज्ज झालेले भाजप आमदार महेश लांडगे यांच्यापुढे अजित गव्हाणे यांच्या रूपाने नव आव्हान समोर असणार आहे. पाच टर्म नगरसेवक राहिलेले अजित गव्हाणे महेश लांडगे यांच्या सारख्या तगड्या नेत्याचा सामना कसा करतात हे देखील पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, चिंचवड आणि भोसरी या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद देखील मोठी आहे. यामुळेच भोसरीमधून भाजपचा राजीनामा देऊन ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेले रवी लांडगे तर चिंचवड मधून ठाकरेंच्या शिवसेनेतून काही इच्छुक होते. मात्र, या दोन्ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटल्याने ठाकरेंच्या शिवसेनेतील इच्छुक काय निर्णय घेतात हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चिंचवड मध्ये दीड वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेचे राहुल कलाटे यांनीच तिकीट न भेटल्यामुळे बंडखोरी केली होती आता तेच कलाटे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. आता इतर ठाकरेंच्या शिवसेनेतील इच्छुक कलाटेंचाच रस्ता धरणार की पक्षादेश पाळणार हेही पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.