नाशिक : ‘असं म्हणतात त्यांना दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा मिळणार आहे. पण त्या पाठिंबा देणाऱ्यांना मला सांगायचंय की, ज्यांना कॉंग्रेसने तिनदा आमदार केलं तरी त्यांनी कॉंग्रेसला फसवलं तर तुमच काय घेऊन बसलात.’ असा सल्ला यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपला दिला आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.
दुसरीकडे मात्र सत्यजित तांबे यांना अद्यापही भाजपने पाठिंबा दिलेला नाही. यावर प्रश्न विचारला असता. ‘भाजपला आम्ही पाठिंबा मागितलेला नाही. त्यामुळे निवडणुक तोंडावर आलेली असली तरी सत्यजित तांबे यांना अद्यापही भाजपने पाठिंबा दिलेला नाही. यावर संभ्रमवस्था असण्याचे कारण नसल्याचे.’ माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी सांगितले.
‘मला डॉक्टर तांबे यांच्याबद्दल खुप आदर आणि चांगल्या भावना होत्या. पण त्यांनी त्या सगळ्या भावनांचा पालापाचोळा करण्याच काम त्यांनी एका तासात केलं. त्यांनी तस सांगितलं असतं तर की, मी उभं राहणार नाही. द्यायची असेल तर सत्यजितला उमेदवारी द्या.’
‘महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरवलं असतं. कोणाला उमेदवारी द्यायची ते ? तांबेंनी असं करून स्वतः च तर नाव खराब केलंच पण त्यांचे मेहुणे कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना ही अडचणीत आणलं. कॉंग्रसलाही अडचणीत आणलं. ‘ असंही राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितलं.
‘त्याचबरोबर पुढे ते म्हणाले की, ‘काँग्रेस म्हटल्यानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी, खरगे साहेब, राज्याचे प्रमुख नाना पटोले आहेत. ही सगळी मंडळी म्हणजे खरी काँग्रेस आहे. आता दिशाभूल करण्याचा प्रयत्न होणार आहे. पदवीधर लोकांना सगळ समजत.’
‘त्यामुळे लोकांना माहित आहे. की, कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीचे खरे उमेदवार कोण आहेत. तसेच फसवणारे कोण आहेत. त्यामुळे काहीही अडचण येणार नाही.’ असं देखील छगन भुजबळ यांनी सत्यजित तांबे यांना पाठींबा देत असलेल्या कॉंग्रेस नेत्यांवर म्हणाले आहेत.