BJP Devendra Fadnavis filed nomination form : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सहाव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. ते आज दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्यापूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी जाहीर सभेला संबोधित (Nagpur Assembly Constituency) केलंय. माननीय गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेला बदल जनता डोळ्याने पाहतेय. दहावर्षातील आमच्या कामामुळे नागपूर शहर बदललं असं, देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
“फक्त २० तारखेपर्यंत सहन करा नंतर..” धनुष्यबाण हाती घेताच निलेश राणेंचं सूचक ट्विट
विदर्भात मोठं परिवर्तन केल्याचं देवेंद्र फडणवीस (BJP) म्हणाले आहे. विदर्भाचं चित्र आम्ही बदलत आहोत. मोदीजींनी नवभारताची निर्मिती सुरू केली, त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत आम्ही नवमहाराष्ट्राची निर्मिती सुरू केलीय. विरोधकांसाठी आमच्या लाडक्या बहिणीच पुरेश्या आहेत, असा टोला फडणवीसांनी लगावला (Maharashtra Assembly Election) आहे. नागपूरची मेट्रो, अमरावतीचं विमानतळ हे सर्व विकासकाम करत तुमच्या आशिर्वादाने मुख्ममंत्री होता आलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. एक जीआर फक्त कॉंग्रेसने काढून दाखवावा, असं आवाहन देखील फडणवीसांनी केलंय.
अजितदादांनी भाजपचे दोन माजी खासदारच फोडले; महायुतीतच फिरले घड्याळाचे काटे
ज्या लाडक्या बहिणींच्या तोंडचा घास पळवण्यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांनी न्यायालयात धाव घेतली, त्यांना लाडक्या बहिणीच पुरून उरतील, अशी टीका फडणवीसांनी केलीय. शेतकऱ्याला मोफत वीज, मुलींना मोफत शिक्षण, प्रत्येक समाजापर्यंत केलेलं भाजपचं काम बोलत असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. दलित-ओबीसींकरिता शिक्षणाचं दार खुलं केलंय, असा विकास कामांचा पाढा देवेंद्र फडणवीस यांनी वाचला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी फडणवीसांनी जोरदार ‘शंखनाद’ केलाय.
सर्वांचं सरकार म्हणजे आपलं सरकार आहे. म्हणून मला विश्वास आहे, या निवडणुकीमध्ये सहाव्यांदा नागपूर दक्षिण पश्चिमची जनता ही मला आशिर्वाद देणार आहे. त्यासोबत कृष्णाभाऊ यांना पुन्हा एकदा विक्रमी मतांनी विजयी करा, असं आवाहन देखील त्यांनी केलंय. मोहनभाऊ यांना देखील विजयी करा. ‘फिर से ये शेर आपके आशिर्वाद से मुंबई मे जाएंगे , असं फडणवीस म्हणाले आहेत. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचा झंडा फडकवूया, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.