BJP : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) राज्यात सर्वच पक्षांकडून कंबर कसण्यात येत असल्याचं चित्र आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यावर विशेष प्रचारक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आलीयं. आता भाजपकडून विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आलीयं. या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी रावसाहेब दानवे (Ravsaheb Danve) यांच्यावर सोपवण्यात आली असून इतर 19 जणांचा व्यवस्थापन समितीत समावेश करण्यात आलायं.
GST: जीएसटी परिषदेमध्ये विमा हप्त्यावरील टॅक्स कमी करण्यावर चर्चा; अजित पवारांची परिषदेला दांडी
विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीत रावसाहेब दानवे यांच्या हाती सुत्र तर सहसंयोजक दिलीप कांबळे, अशोक नेते, श्रीकांत भारतीय, जाहीरनामा समिती सुधीर मुनगंटीवार, विशेष संपर्क समितीवर चंद्रकात पाटील, समाजिक संपर्क समिती पंकजा मुंडे, महिला संपर्क समिती विजयाताई रहाटकर, कृषी क्षेत्र संपर्क समिती राधाकृष्ण विखे पाटील, युवा संपर्क समिती रक्षा खडसे, तर प्रचार यंत्रणा समिती रविंद्र चव्हाण, सहकार क्षेत्र समिती प्रविण दरेकर, तसेच अनुसूचित जाती संपर्क समिती विजय गिरकर, अनुसूचित जमाती संपर्क समिती विजयकुमार गावित, सोशल मीडिया आय.टी. निरंजन डावखरे, मीडिया अतुल भातकळकर, महायुती निवडणूक अभियान समन्वयक गिरीष महाजन, निवडणूक आयोग संपर्कप्रमुख किरीट सोमय्या, ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संपर्क प्रमुख केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलीयं.
“जर निष्पक्ष निवडणुका झाल्या असत्या तर भाजपाला…” राहुल गांधींचा खळबळजनक खुलासा
विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीच्या संयोजकपदी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची निवड करण्यात आली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आलीयं. त्यामुळे आता भाजपच्या विजयासाठी गडकरी, फडणवीस, दानवे, बावनकुळे या नेत्यांना प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढावा लागणार आहे. भाजपकडून याआधीच स्टार प्रचारकांचीही घोषणा करण्यात आलीयं. या स्टार प्रचारकांमध्ये काँग्रेसमधून भाजपात उडी घेतलेले अनेक नेते आहेत. यामध्ये खासदार अशोक चव्हाण, नारायण राणे, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे.
दरम्यान, अवघ्या काही महिन्यांत महाराष्ट्रात निवडणूक पार पडणार आहेत. या निवडणुका जिंकण्यासाठी महाविकास आघाडीचं मोठं आव्हान भाजपसमोर असणार आहेत. हे आव्हान भाजपचे नेते कसं पेलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.