मुंबई : गेल्या रविवारी छ.संभाजीनगर येथील माजी उपमहापौर शिंदेंनी भाजपची साथ सोडत ठाकरे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर ठाकरेंनी भाजपला खिंडार पाडण्यास सुरूवात केल्याचे बोलले जात होते. मात्र, आता ठाकरेंनंतर शरद पवारांनीदेखील (Sharad Pawar) भाजपला सुरूंग लावण्यास सुरूवात केली असून, पवारांनी भाजपचा माजी हुकमी एक्क्याला हेरत त्यांचा डाव यशस्वी केला आहे. विधानसभेपूर्वी भाजपमधील नेते पक्ष सोडून जात असल्याने भाजपची धाकधूक काहीशी वाढली आहे. पवारांनी सुधाकर भालेराव यांना पक्षात घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे मंत्री संजय बनसोडे यांना आव्हान देण्यासाठी पवारांनी एक मोठा मोहरा गळाला लावल्याचे बोलले जात आहे. (BJP Formar MLA Sudhakra Bhalerao Join Sharad Pawar Group)
Sharad Pawar यांच्या सात शिलेदारांची आमदारकी निश्चित; जाणून घ्या कारणं
पवारांनी कुणाला हेरलं?
“मला सोडून गेलेल्या किमान 80 टक्के आमदारांना तरी घरी बसवणार, अशी भीष्म प्रतिज्ञा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा मनसुबा बोलून दाखवला होता. पण ते फक्त बोलून शांत बसलेले नाहीत. तर या प्रतिज्ञेप्रमाणे चालीही आखत आहेत. त्यानुसार यापूर्वी पक्ष सोडून गेलेले माजी आमदार, भाजपचे माजी आमदार, भाजपमध्ये डावलण्यात आलेल्या नेत्यांना संपर्क करत आहेत. त्यानुसार आता पवारांनी त्यांचा डाव यशस्वी करण्यास सुरूवात केली असून, भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी मोठा निर्णय घेत स्वत: भाजपाच्या कार्यालयाला भेट देऊन राजीनामा दिला आहे. आता ते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
IAS पूजा खेडकरला महाराष्ट्राच्या प्रश्नांचीही उत्तरे येईनात; मॉक इंटरव्ह्युचा Video समोर
सुधाकर भालेराव हे उदगीर राखीव मतदार संघातून भाजपचे सलग दोन वेळा आमदार होते. 2019 च्या निवडणुकीत भाजपने त्यांना डावलले. परभणी येथील डॉक्टर अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे संजय बनसोडे हे विजयी झाले. आता बनसोडे यांनी अजितदादा गटात प्रवेश केला असून सध्या ते क्रीडामंत्री आहेत. विधानसभा निवडणुकीतही भाजपची अजितदादा गटासोबत युती असल्यामुळे संजय बनसोडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, हे निश्चित आहे.
पडळकर म्हणतात, ‘पवारांचा जमिनी लुटायचा छंदच’; रोहित पवारांचं कर्जतचं निवासस्थान वादाच्या भोवऱ्यात?
भाजपला का केला रामराम?
सुधाकर भालेराव हे उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केली आहे. मात्र भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नव्हती, असे सांगितले जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. पण, ऐन विधानसभेपूर्वी भाजपचे माजी आमदार आणि नेते पक्षाची साथ सोडत असल्याने पक्षाातील नेत्यांची धाकधूक वाढली आहे.