Ashish Shelar on Uddhav Thackeray : काल हिंगोलीच्या सभेत बोलतांना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना फडतूस, कलंक, थापाड्या असं संबोधत त्यांच्यावर निशाणा साधला. तर शिंदे गटाने माझे वडिल चोरले, त्यांनी मत मागायला माझे वडिल लागतात… नामर्द, अशी टीका केली होती. ठाकरेंनी केलेली टीका भाजप नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. दरम्यान आता भाजप ऩेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी त्यांचा जोरदार समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांची अवस्था शोलेमधल्या जेलरसारखी झाल्याचं शेलार म्हणाले.
आज माध्यमांशी संवाद आशिष शेलार यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांना हिंगोलीतील उध्दव ठाकरेंच्या भाषणाविषयी विचारले असता ते म्हणाले की, आज-काल उद्धव ठाकरेंच्या सभा म्हणजे पूर्वीच्या काळात जे गावात येऊन महिला रडायच्या ते म्हणजे उद्धव ठाकरे. रडके उद्धव ठाकरे. यांना स्वतः चे विचार नाही, धोरण नाही. त्यामुळे हा त्यांचा पक्ष विचार धोरण सोडून बोलतो. आज उद्धव ठाकरे यांची अवस्था शोले मधल्या जेलर सारखी झाली आहे. आधे इधर आणि आधे उधर आणि हे कडक जेलर. आम्हाला ठाकरेंना घरबश्या, घरकोंबडा बोलायचं नाही. ती आमची संस्कृती नाही. पण ठाकरेंनी मर्यादेत रहाव, असं शेलार म्हणाले
“तुझ्या तोंडात साखर पडो” : सुपर पालकमंत्रीपदावर अजितदादांचे सेफ अन् मिश्किल उत्तर
इंडियाच्या बैठकीबाबत आशिष शेलार म्हणाले, ‘हे इंडिया वगैरे काही नाह, घमंडीय आघाडी आहे. हे देशहितासाठी एकत्र नाही आले. यांना लोकशाही वाचवयाची नाही. हे एकत्र आले ते फक्त आपला पक्ष आणि परिवार वाचवण्यासाठी, अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले एनडीएमध्ये उद्धव ठाकरेंना सन्मान होता. मात्र, आज त्यांना इंडिया आघाडीत पायघड्या घालाव्या लागतात. होऊ न घातलेल्या पंतप्रधांनाकडे त्यांना मी तुमच्या जवळाचा आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, अशी मनधरणी करावी लागतेय. स्वत:च्या पदाच्या लालसेपीटी ते शिवसैनिकांच्या स्वाभिमानाशी किती खेळणार, असा सवाल शेलारांनी केला.
फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावरून ठाकरेंनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. राज्यात दुष्काळ आहे, आणि फडणवीस दौरे करताहेत, अशी टीका ठाकरेंनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार शेलारांनी घेतला. ते म्हणाले, तुमच्या सरकारच्या काळात तुम्ही कुठे गेला होता? तुम्ही गेले का नांगर घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर ? असा सवाल करत राज्याचे उपमुख्यमंत्री हजारो कोटींचे प्रकल्प घेऊन आले. मेट्रोसाठी प्रोजेक्ट घेऊन आले आहेत, मग तुमच्या पोटात का दुखते? असा सवाल केला. ते म्हणाले, कांदा उत्पादकांच्या प्रश्नांच्या संदर्भात झालेल्या बैठकीत फडणवीस जपानहून हजर होते, मात्र, तुमच्या सरकारच्या काळआत तुम्ही घराच्या एसीतूनही बाहेर आला नाही, असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला.