Download App

मुंडेंच्या ‘त्या’ विधानावर भाजपची काय भूमिका? बावनकुळेंनी सांगितलं मनातलं…

Chandrashekhar Bawankule On Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja munde) यांच्या परळी वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई झाल्यानंतर त्यांनी मोठं विधान केल्याचं पाहायला मिळालं. ईश्वर न करो आयुष्यात मला काही निर्णय घेण्याची वेळ येवो, असा निर्णय घेणं हे खुपच दुःखदायक असतं, असं विधान मुंडे यांनी केलं. मुंडेंच्या या विधानावर आता भाजपची नेमकी भूमिका काय? यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी(Chandrashekhar Bawankule) भाष्य केलं आहे.

Video : संजय राऊत म्हणजे राजकारणातील शक्ती कपूर; नितेश राणेंनी उडवली खिल्ली

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंकजा मुंडे यांची साखर कारखान्याप्रकरणी चौकशी होणार आहे, या चौकशीत पंकजा मुंडे योग्य उत्तर देतील, त्या आमच्या नेत्या आहेत, त्यांनी खूप काम केले आहे, भाजप त्यांच्या पाठीशी उभा असून त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा काढू नये की त्या वेगळ्या निर्णय घेतील, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.

सिंह आला पण गड गेला! पवारांचा विजय; पॅनेलचा पराभव : अनेक वर्षांच्या वर्चस्वाला भाजप नेत्यांचे हादरे

तसेच पंकजा मुंडेंच्या रक्तात भाजप असून त्यांच्या बोलण्याचा विपर्यास करु नये, त्यांना अडचणीच्या काळात नोटीस आली असेल तर मी त्यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

धनगर आरक्षण! गिरीश महाजन उपोषणकर्त्यांच्या भेटीला, पालकमंत्री विखेंच्या विरोधात घोषणाबाजी…

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
गोपीनाथ मुंडेंपेक्षा जास्त संघर्षाची वेळ आपल्यावर आली. माझ्याविरोधात कोणीही अफवा उठवू नये. ईश्वर न करो आयुष्यात मला काही निर्णय घेण्याची वेळ येवो. असा निर्णय घेणं हे खुपच दुःखदायक असतं, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली.

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर रविवारी जीएसटी विभागाने कारवाई केली. या प्रकरणी कारखान्याची तब्बल 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावरील कारवाईमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. या कारवाईनंतर विरोधकांकडूनही जोरदार निशाणा साधला होता.

केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने सहा महिन्यांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर छापा टाकून काही कागदपत्रांची तपासणी केली होती. त्यात या कारखान्याने 19 कोटी रुपयांचा जीएसटी कर बेकायदेशीरपणे बुडवल्याचं स्पष्ट झाले.

Sanjay Raut : 2024 च्या आधी भाजप फुटणार! NDA फक्त नौटंकी; राऊतांचा दावा

त्यानंतर काल औरंगाबाद येथील जीएसटी आयुक्तालयाने या कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे आहेत. वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर झालेली कारवाई हा पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Tags

follow us