Video : संजय राऊत म्हणजे राजकारणातील शक्ती कपूर; नितेश राणेंनी उडवली खिल्ली
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणजे राजकारणातील शक्ती कपूर असल्याची बोचरी टीका भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे. राणेंच्या या टीकेनंतर राणे आणि राऊतांमधील वाद अधिक शिगेला जाण्याची शक्यता आहे. राणेंच्या या टीकेला आता राऊत काय उत्तर देणारे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राणेंनी यावेळी सामनामध्ये प्रकाशित लेखावर जोरदार हल्लाबोल केला. (Nitesh Rane Criticize Sanjay Raut )
मोठी बातमी : माजी खासदार विजय दर्डांसह पुत्राला दिलासा; कोळसा घोटाळा प्रकरणातील शिक्षेला स्थगिती
महिला आरक्षणाचा त्रास सर्वात जास्त राऊतांना होणार
यावेळी राणेंनी महिला आरक्षणावरून राऊतांना टार्गेट केले. ते म्हणाले की, महिला आरक्षणाचा सर्वात जास्त त्रास संजय राऊतांना होणार आहे. कारण राजकारणातील शक्ती कपूर जेलमध्ये असणार आहे. त्यामुळे महिला आरक्षणाची सर्वात जास्त भीती राऊतांना वाटणं रास्त आहे. राज्यातील सध्याच्या त्रिशूळ सरकारबाबत कुणीही कितीही पुड्या सोडल्या तरी कुणी काहीच वाकडं करू शकत नाही असेही राणे म्हणाले.
Maneka Gandhi : ‘इस्कॉन’कडून गाईंची कसायांना विक्री! भाजप नेत्या मनेका गांधींच्या आरोपाने खळबळ
काँग्रेस हा गंजलेल्या लोखंडासारखा आहे असे तुम्ही म्हणत असाल, पण भाजप हा विचार नसलेल्या पोकळ बांबूसारखा झाल्याची टीका सामनातून करण्यात आली होती. यावर पलटवार करताना राणे म्हणाले की, भाजपा गंजलेला बांबू तर तुमची उद्धव बाळसाहेब ठाकरे म्हणजे पवारांनी थुंकलेली सुपारी असल्याचे राणेंनी म्हटले आहे.
Sanjay Raut : बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार? राऊतांनी सांगितलं कोण जिंकणार
अरबन नक्षल आणि संजय राऊत यांचा संबंध आहे का?. दोघांचे गुण समान वाटतात. त्यामुळे केंद्राने अरबननक्षल आणि संजय राऊत यांचे संबंध आहेत का? याचा तपास करावा असेही राणे यावेळी म्हणाले.आदित्य ठाकरेंच्या एका ट्विटमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा परदेश दौरा रद्द झाल्याचा दावा राऊतांनी केला होता. त्यावर बोलताना राणे म्हणाले की, तुमचा मालक मुख्यमंत्री असताना दावस दौरे का झाले?” असा सवाल करत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळे एक माशी मरत नसल्याचे म्हणाले.