धनगर आरक्षण! गिरीश महाजन उपोषणकर्त्यांच्या भेटीला, पालकमंत्री विखेंच्या विरोधात घोषणाबाजी…

धनगर आरक्षण! गिरीश महाजन उपोषणकर्त्यांच्या भेटीला, पालकमंत्री विखेंच्या विरोधात घोषणाबाजी…

Girish Mahajan : धनगर आरक्षणासाठी (Dhangar Reservation) अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावात गेल्या 20 दिवसांपासून यशवंत सेनेच्यावतीने आंदोलन सुरु आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज मंगळवारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनGirish Mahajan यांनी आंदोलकांशी त्या ठिकाणी जाऊन चर्चा केली. त्याचबरोबर आंदोलकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांच्याशी चर्चा घडवून आणली. त्याचवेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अनुपस्थितीमुळे उपोषणकर्त्यांनी पालकमंत्र्यांचा धिक्कार असोच्या घोषणा दिल्या. तसेच विखे पिता-पुत्रांविरोधात घोषणाबाजी केली.

हीच नफा कमावण्याची संधी; सर्वोच्च न्यायालयाने दिली व्यापाऱ्यांना ‘बिझनेस आयडिया’

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे काल सोमवारी (दि.25) चौंडी येथे जाऊन आंदोलकांची भेट घेणार होते. मात्र काही कारणास्तव त्यांना चौंडी या गावात जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे आज मंत्री महाजन यांनी धनगर आरक्षणासाठी बसलेल्या आंदोलकांची भेट घेतली आहे. त्यांच्या मागण्या सविस्तर जाणून घेतल्या. त्याचबरोबर त्याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं करुन दिलं.

Shreyas Talpade: दगडूशेठचा रस्ताच चुकला अन् पुढे अभिनेत्यासोबत असं काही घडलं…

गत 20 दिवसांपासून धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी चौंडीमध्ये उपोषण सुरु आहे. त्यामुळे या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतली असून, त्यावर सकारात्मक चर्चा सुरु असल्याचे आमदार राम शिंदे यांनी सांगितले आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी चौंडीत आंदोलकांची भेट घेण्यासाटी पोहोचले, मात्र नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या आंदोलकांकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आंदोलकांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा धिक्कार असोच्या घोषणा देण्यात आल्या.

उपोषणस्थळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात यावेळी वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. त्या ठिकाणी आंदोलकांनी आमची मतं चालतात मात्र भंडारा नको, असा सवालही उपस्थित केला. त्यामुळे आता या आंदोलकांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube