Shreyas Talpade: दगडूशेठचा रस्ताच चुकला अन् पुढे अभिनेत्यासोबत असं काही घडलं…

Shreyas Talpade: दगडूशेठचा रस्ताच चुकला अन् पुढे अभिनेत्यासोबत असं काही घडलं…

Shreyas Talpade Ganapati Darshan: सध्या गणपतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे आणि भक्तिमय आनंदाचं वातावरण आहे. अनेक कलाकारांच्या घरीही बाप्पा विराजमान झाला आहे. त्याचे फोटो आत्तापर्यंत अनेक सेलिब्रेटींनी पोस्ट केले आहेत. (Instagram post) पुण्याच्या मानाच्या गणपतीला अनेक सेलिब्रिटी आपली हजेरी लावत असल्याचे बघायला मिळत आहे. (Shreyas Talpade) नुकताच काल दगडुशेठ गणपतीच्या दर्शनासाठी मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे आल्याचे बघायला मिळाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)


दर्शनाला जात असतानाअभिनेत्याने चाहत्यांबरोबर एक रंजक असा ‘किस्सा’ शेअर केल्याचे बघायला मिळाले आहे. अभिनेता श्रेयस तळपदे हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतो. यावेळी अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्याने पुण्यातील ट्राफिक पोलिसांचे (Pune Police) आभार मानले आहे, त्याच्याबरोबर असा नेमकं काय घडलं आहे? तोच किस्सा त्याने पोस्टमध्ये चाहत्यांसोबत शेअर केल्याचे बघायला मिळत आहे. श्रेयस तळपदे आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे की “देव आपल्याला कोणत्याही मार्गाने अथवा रुपाने भेटायला येत असतो, आज तो मला बापू वाघमोडे यांच्या रूपामध्ये भेटायला आला आहे.

तसेच श्रेयस तळपदे आपल्या पोस्टमध्ये पुढे सांगितले आहे की, “दगडू शेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाला जात असताना आम्ही वाटेतमध्येच रस्ता चुकलो होतो. चुकलेली वाट दाखवण्यासाठी आमच्याकडे बापू वाघमोडे आले आणि त्यांना योग्य रस्ता दाखवला आहे. तो ट्राफिक हवलदार यांनी आम्हाला त्यांच्या बाईकवरुन रस्ता दाखवला. आणि आम्ही बाप्पाच्या दर्शनाला वेळेमध्ये कसे पोहोचू, यासाठी बापू वाघमोडे यांनी उत्तम प्रयत्न करत आम्हाला दर्शनाच्या ठिकाणी पोहचवले. धन्यवाद साहेब…” अशी पोस्ट श्रेयस तळपदे यांनी लिहिली आहे.

तसेच “देव कायमच आपल्या सोबत असतो. याचा फक्त आपल्याला भास व्हायला हवा. आणि मला तो काल भास अनुभवायला मिळाला आहे. आपल्या समोर देव हा कोणत्या रुपामध्ये येतो, हे फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ते आम्हाला भेटले, त्यांनी आम्हाला मदत केली, त्यांनी आम्हाला योग्य मार्ग देखील दाखवला. आणि आमच्यासोबत संवाद केला. तसेच हा देवा जो होता आमच्यासोबत बोलणारा देव होता, याची प्रचिती होणे, आवश्यक आहे. कायम आपण सर्वांनसोबत अत्यंत आदराने वागायला हवे, कारण देव हा कधी कोणत्या रुपामध्ये येऊन आपल्याला भेटेल हे सांगू शकत नाही. गणपती बाप्पा मोरया…” असे त्याने यावेळी सांगितले आहे.

Katrina Kaif: कैटरीना कैफ ठरली UNIQLO ची पहिली भारतीय ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

श्रेयसच्या या पोस्टवर खुद्द ट्राफिक पोलिस बापु वाघमोडे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्याचे बघायला मिळाले आहे. कमेंट करत बापु वाघमोडे म्हणाले आहेत की, “दादा खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. माझा फोटो पोस्ट केल्याबद्दल  खूप खूप धन्यवाद. तेव्हा मला तुमच्याशी बोलत असताना सुचलं नाही की आम्ही दोघे नवरा बायको तुमचे big fan आहे, म्हणून आम्ही आमच्या मुलाचे नाव पण तुमच्या नावावरून ठेवल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे… Shreyash bapu waghmode जय हिंद…” असे बापु वाघमोडेनी त्या पोस्टला कॉमेंट्स केल्याचे दिसत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube