Download App

बंडखोरांना पुन्हा भाजपात घेणार का? बावनकुळेंच्या उत्तराने ‘त्यांची’ घरवापसी बारगळणार..

विरोधात लढलेल्यांना तुर्तास पक्षात घेऊ नये असं ठरलं आहे, असे बावनकुळे म्हणाले आहेत.

Chandrashekhar Bawankule : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अनेकांनी पक्षांतरं केली. अनेकांचा हा प्रयोग यशस्वी ठरला मात्र असेही काही नेते होते ज्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर पक्षांतर केलेल्या या नेतेमंडळींत अस्वस्थता वाढू लागली आहे. या अस्वस्थतेतूनच त्यांनी पुन्हा घरवापसी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु, या भाजप या मंडळींना पुन्हा पक्षात घेणार का असा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिलं आहे. विरोधात लढलेल्यांना तुर्तास पक्षात घेऊ नये असं ठरलं आहे, असे बावनकुळे म्हणाले आहेत.

अजितदादांना लवकरच धक्का! सांगलीतील ‘हा’ मोठा नेता भाजपाच्या वाटेवर; घरवापसीचे संकेत

बावनकुळे पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे गटाने 2019 मध्ये ब्लंडर युती केली होती. हे आता त्यांना चांगलंच कळालं आहे. त्यांनी जी युती केली होती. त्यांच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे पोहोचत होते. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली जात होती. काँग्रेसच्या विचारांवर शिवसेना कधीच पुढे जाऊ शकत नाही. आमच्याकडून स्वतंत्र लढलेल्यांना आम्ही पक्षातून काढून टाकलं आहे. जे उमेदवार निवडणुकीत आमच्या विरोधात लढले त्यांना तूर्तास पक्षात घ्यायचं नाही असं आमचं ठरलं आहे. भविष्यात आम्ही तीन नेत्यांचा विचार घेऊन पुढे जाणार आहोत, असे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात भाजपाची सदस्य संख्या दीड कोटी असावी आमचा संकल्प आहे. तसेच एक लाख बूथ अध्यक्ष समिती असावी, प्रत्येक तालुक्यात पक्षाचा अध्यक्ष असावा आणि समिती फेब्रुवारीपर्यंत गठीत करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. राज्यातील 69 जिल्हाध्यक्ष आणि मुंबई असे एकूण 76 जिल्हाध्यक्ष फेब्रुवारीपर्यंत निवडले जातील असे बावनकुळे यांनी सांगितले.

आठ एकरात मंडप ते १५ एकरात पार्किंग; भाजपाच्या शिर्डी अधिवेशनाची जय्यत तयारी

आजपासून शिर्डीत महाअधिवेशन

भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या आजपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे होत आहे. नुकत्याच मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रणनिती या अधिवेशनात ठरविली जाणार असल्याने या अधिवेशनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या अधिवेशनात अनेक राजकीय मुद्द्यांवरही चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

अधिवेशनासाठी साई संस्थानच्या प्रसादालया शेजारील शताब्दी मैदानावर तीन भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. ११ तारखेला भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होऊन १२ तारखेला सकाळी नड्डा अधिवेशाचे उद्घाटन करतील. दुपारी शाह भाजपच्या मंत्री, खासदार, आमदारांसह आलेल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तसेच पुढील वाटचालीच्या रणनीतीवर अधिवेशनात शिक्कामोर्तब होईल. अमित शाह शिर्डीनंतर शनिशिंगणापूरलाही जाणार आहेत.

follow us