Download App

अहो सर्वज्ञानी, ‘सामना’चे मथळे सजवण्यापेक्षा जरा…; चित्रा वाघांची संजय राऊंतावर टीका

  • Written By: Last Updated:

Chitra Wagh : पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांनी शेतमालाला किमान हमी भाव मिळावा या मागणीसाठी दिल्लीकडे मोर्चा वळवला. मात्र या शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखले जात आहे. त्यासाठी दिल्लीच्या सीमेवर हजारो पोलीस तैनात करण्यात आले. शेतकऱ्यांना रोखण्यासाएठी रस्त्यावर खिळे ठोकले जात आहेत, यावरून संजय राऊतांन (Sanjay Raut) सरकारवर जोरदार टीका केली. सरकार शेतकऱ्यांवर (Farmer) गोळ्या झाडण्याच्या तयारीत आहे, अशी टीका त्यांनी केला. त्या टीकेला आता भाजप नेत्या चित्रा वा (Chitra Wagh) यांनी प्रतित्युत्तर दिलं.

पवारांचा शेवटचा डाव तुम्हाला चितपट करेल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला इशारा 

सनसनाटी बोलून ‘सामना’चे मथळे सजवण्याचे उद्योग करण्यापेक्षा जरा जबाबदारीने बोला, जरा ताळ्यावर या आणि मग तोंड उघडा, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

चित्रा वाघ यांनी एक ट्विट करत राऊतांवर निशाणा साधला. त्यांनी लिहिलं की, अहो सर्वज्ञानी… संजय राऊत, सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्यांविषयी सहानुभूती आहे म्हणूनच दररोज अर्धा डझन केंद्रीय मंत्री त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताहेत..काही गोष्टींवर एकमत झालंय, काहींवर चर्चा करून तोडगा काढताहेत. लवकरच शेतकऱ्यांना अपेक्षित असा निर्णय घेतला जाईल… तुम्ही कशाला उगीच खोटेनाटे आरोप करताय? सनसनाटी बोलून ‘सामना’चे मथळे सजवण्याचे उद्योग करण्यापेक्षा जरा जबाबदारीने बोला, असा खोचक सल्लाही चित्रा वाघ यांनी दिला.

रकुल प्रीत-जॅकी भगनानी अडकले विवाहबंधनात; पाहा फोटो 

त्यांनी पुढं लिहिलं की शेंडा-बुडखा नसलेले बेभान जावईशोध लावून टीव्हीवर सताड फुटेज खाण्याऐवजी योग्य माहिती घ्या, ताळ्यावर या आणि मग तोंड उघडा, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

संजय राऊत काय म्हणाले?
आज माध्यमांशी बोलतांना राऊत म्हणाले की, शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. ही मागणी घेऊन पंजाबमधील हजारो शेतकरी दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांना रोखण्यासाठी सशस्त्र दल तैनात करण्यात आले आहे. मात्र शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. दुसरीकडे, शेतकरी पुढे सरसावले तर सरकार त्यांना गोळ्या घालायची सरकारची तयारी आहे, अशी आपल्याकडे गुप्त माहिती आहे. अदानींना देण्यासाठी लाखो, हजारो कोटींचे व्यवहार केले जातात. मात्र शेतकऱ्यांना अडीच कोटी रुपये लागणार आहेत. तरीही सरकार कोणतीही तरतूद करायला तयार नाही, अशी टीका राऊतांनी केली होती.

follow us